'थलायवी' ट्रेलर प्रदर्शित ; कंगना झाली भावूक

    23-Mar-2021
Total Views | 80

Kangana_1  H x
 
 
नवी दिल्ली : तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये त्यांची भूमिका अभिनेत्री कंगना रानौत साकारणार असून दक्षिण क्षेत्रातील बरेचसे प्रसिद्ध चेहरे या चित्रपटात आहेत. विशेष म्हणजे, आज कंगनाचा वाढदिवस औचित्य साधून हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनयापासून राजकीय क्षेत्रापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
 
 
 
 
 
 
चेन्नईत झालेल्या ट्रेलर लाँचवेळी कंगना भावूक झाल्याचे चित्र दिसून आले. कंगनाने या भावूक क्षणाचा व्हिडीओ तिच्या ट्विटरवरही शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, "मी स्वत:ला बब्बर शेरनी म्हणते. कारण मी कधीच रडत नाही आणि कोणालाही मला रडवण्याची संधीही देत नाही. मी यापूर्वी कधी रडले होते, मला आठवत नाही. पण आज मी रडले, खूप रडले आणि आता मला एकदम मोकळे वाटते आहे."
 
 
थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेता असा ३० वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये जयललिता यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांनी मिळवलेले यश चित्रीत करण्यात आले आहे. जयललितांच्या प्रत्येक व्यक्तीरेखेला कंगनाने पुरेपुर न्याय दिला आहे. हा चित्रपट २३ एप्रिल २०२१ रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधून जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121