शहरांच्या देशा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2021   
Total Views |

art_1  H x W: 0


आपल्या देशातील राहण्यायोग्य शहरांची यादी नुकतीच केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली. त्यानिमित्ताने विविध निकषांन्वये घेतलेल्या शहरांवर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप...



देशात मोठ्या ४९ शहरांमध्ये (ज्यांची लोकसंख्या दहा लाखांहून अधिक) बंगळुरू आणि छोट्या ६२ शहरांमध्ये (लोकसंख्या दहा लाखांहून कमी) सिमला ही शहरे वास्तव्यासाठी सर्वात योग्य असल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाचे मंत्री हरदीप पुरी यांनी दिला आहे.पहिल्या ४९ शहरांच्या गटातील पहिली दहा शहरे पुढे दिलेल्या क्रमवारीत जाहीर झाली आहेत - बंगळुरू, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सुरत, नवी मुंबई, कोईमतूर, वडोदरा, इंदूर, बृहन्मुंबई.पुणे शहर टिकाव धारण करण्यात अव्वल, नवी मुंबई करमणुकीची साधने व जीवनाचा दर्जा आणि ठाणे शहर हे गतिक्षमतेत (ोलळश्रळीूं) चांगले ठरले आहे. २०१८ मध्ये पुणे शहर पहिल्या, नवी मुंबई दुसर्‍या व बृहन्मुंबई तिसर्‍या क्रमांकावर राहण्यायोग्य शहरातील क्रमवारीत आले होते.तसेच पहिल्या गटातील शेवटच्या दहा दर्जामध्ये पुढे दिलेली शहरे क्रमवारीत आली आहेत - फरिदाबाद, विजयवाडा, रांची, जबलपूर, कोटा, अमृतसर, गुहोलाह, बरेली, धनबाद, श्रीनगर.दुसर्‍या ६२ शहरांच्या गटातील पहिली दहा शहरे पुढे दिलेल्या क्रमवारीत आली आहेत - सिमला, भुवनेश्वर, सिलवासा, काकिन्दा, सालेम, वेल्लोर, गांधीनगर, गुरगांव, दावणगिरी, तिरुचलापल्लई, तसेच शेवटच्या दहाच्या पंक्तीत पुढे दिलेली शहरे क्रमवारीत आली आहेत - इटानगर, रुरकी, पासिघाट, दिंडीगल, ऐझामल, अलिगढ, रामपूर, नामची, सटना, मुझपरापूर देशातील पहिल्या गटातील पहिल्या दहा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या महापालिका-नगरपालिका पुढीलप्रमाणे - इंदूर, सुरत, भोपाळ, पिंपरी-चिंचवड, पुणे, अहमदाबाद, रायपूर, बहन्मुंबई, विशाखापट्टणम, वडोदरा. तसेच दुसर्‍या गटात पुढीलप्रमाणे आली आहेत - नवी दिल्ली, त्रिपुरा, गांधीनगर, करनाल, सेलम, तिरुपूर, बिलासपूर, उदयपूर, झासी, तिरुनेलवल्ली.सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या महापालिका-नगरपालिकांमध्ये पहिल्या गटात इंदूरने प्रथम स्थान व महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवडने चौथे, पुणेने पाचवे, बृहन्मुंबईने आठवे अशी स्थाने पटकावली आहेत. तसेच दुसर्‍या गटात नवी दिल्ली नगराने प्रथम स्थान पटाकावले आहे.
देशातील राहण्यायोग्य क्रमवारी २०१८ सालापासून ठरविली जात आहे. यात चार मुख्य स्तंभ (जीवनाचा दर्जा ३५ टक्के, आर्थिक सामर्थ्य १५ टक्के, उपजीविकेची साधने २० टक्के व नागरिकांची समज ३० टक्के) आहेत. शिवाय १४ उपस्तंभ आहेत. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, आर्थिक विकास, महसूल व्यवस्थापन, अंकीय प्रशासन, अंकीय साक्षरता, पारदर्शता, मनुष्यबळ विकास, पर्यावरण, घर व निवारा इत्यादी निकषांच्या आधारे शहरे राहण्यायोग्य आहेत का ते ठरविले जाते. ही क्रमवारी ठरविताना १६ जानेवारी ते २० मार्च, २०२० या काळाच्या दरम्यान ३२ लाख २० हजार लोकानी नोंदविलेली मते विचारात घेण्यात आली.मुंबईच्या बाबतीत ४५.७ टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते म्हणून घर व निवारा या उपस्तंभात मुंबईला ६०, तर राष्ट्रीय दर्जा ७५ गुणांचा आहे. मुंबईला कमी गुण मिळाले. या उपस्तंभात दिल्ली, भोपाळ, ठाणे, वसई-विरार आणि नवी मुंबई यांना जास्त गुण मिळाले आहेत. नवी मुंबईच्या बाबतीत हे कळते की, ते एक पूर्णपणे आखीव व संरचित शहर आहे. तेथे पुष्कळशा मोकळ्या जागा, उद्याने, झाडे, रेल्वेचे जाळे व मोठे रस्ते बांधले गेले आहेत. स्वच्छता चांगली व घनकचरा निर्मूलनाचे चांगले व्यवस्थापन आहे. त्यामुळे या शहराला गुण चांगले मिळाले, तशीच चांगल्या गुणांच्या दर्जाची मिळकत गांधीनगर व नवी दिल्ली या नवरचित शहरांना मिळाली आहे.

देशातील निरोगी शहरे


‘इंडिया फिट अहवाल २०२०’, या संस्थेने भारत देशातील निरोगी शहरे कोणती आहेत, हे जाणून घेण्याकरिता एक सर्वेक्षण केले व निरोगी सात शहरांची छोटी यादी बनविली ती अशी -
१. चंदिगढ : हे सुंदर असे शहर ‘ला कार्बुझिअर’ या स्थापत्त्य तज्ज्ञाने संरचित केले. निरोगी शहरांच्या यादीतील हे देशातील क्रमांक एकचे निरोगी शहर मानले जाते. या शहरात पोटाचा घेरा व वजन निर्देशांक (बीएमआय) प्रमाणात असलेले अनेक जण आढळतात, शिवाय जीवनशैलीचे आजार असणार्‍या नागरिकांची संख्या इतर शहरांच्या मानाने तुलनेत कमी आहे. येथील नागरिक भरपूर पाणी पितात आणि येथे तंबाखू-सिगारेट ओढणार्‍यांची संख्याही कमी आढळते. सरासरी हवेतील वायुप्रदूषण ‘एक्यूआय’ निर्देशांक ४७ (चांगला दर्जा). नागरिकांचे अपेक्षित जीवनमान ६८.६ वर्षे.

२. जयपूर : ऐतिहासिक स्थळांची आवड असणार्‍यांनी या शहराला जरुर भेट द्यावी असे हे शहर. या शहराला ‘गुलाबी शहर’ म्हणून ओळखले जाते व त्याची बांधणी अजमीरचा राजा जयसिंग दुसरा याने सन १७२७ मध्ये केली. येथील नागरिक चवीपरीने खाण्याचे अतिशय भोक्ते आहेत. येथील लोकांचा ‘बीएमआय’ निर्देशांक दर्जाही प्रमाणित आहे. येथील नागरिकांचा झोपण्याचा सरासरी वेळ सात तासांहून अधिक आहे. वायुप्रदूषण ‘एक्यूआय’ निर्देशांक ९४ (साधारण दर्जा). अपेक्षित जीवनमान ६७.७ वर्षे.

३. बंगळुरू : या शहराला ‘उद्यानाचे शहर’ वा ‘सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया’ या सन्मानाने ओळखतात. येथील नागरिक दिवसाला सहा तास ५६ मिनिटांची झोप घेतात. या शहराचा वायुप्रदूषण ‘एक्यूआय’ निर्देशांक ७७ (साधारण दर्जा). अपेक्षित जीवनमान ६८.८ वर्षे इतके आहे.

४. पुणे : या शहराला ‘दख्खनची राणी’ या नावानेही ओळखले जाते. तुलनात्मकरीत्या या शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. वायुप्रदूषण निर्देशांक १८७ (खराब दर्जा) असून अपेक्षित जीवनमान ७१.६ वर्षे इतके आहे.
५. हैदराबाद : या शहराला ‘निझामनगर’ वा ‘मोत्यांचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. येथे रक्तदाबाने पीडित असणारे नागरिक तुलनेने कमी संख्येत आढळतात. याशिवाय अ‍ॅलर्जी, हृदयरोगी व अ‍ॅसिडिटी असणारे रुग्णही कमी संख्येत आहेत. वायुप्रदूषण ‘एक्यूआय’ निर्देशांक ८१ (साधारण दर्जा) आहे. अपेक्षित जीवनमान ६८.५ वर्षे.
६. चेन्नई : या शहराला ‘आरोग्याकरिता केंद्रस्थान’ म्हणून ओळखले जाते, कारण तेथे विविध प्रकारची औषधे व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळते. सर्व ठिकाणाहून लोक येथे वैद्यकीय मदतीकरिता येतात. वायुप्रदूषण ‘एक्यूआय’ निर्देशांक १७० (वाईट दर्जा). अपेक्षित जीवनमान ७०.६ वर्षे.
७. मुंबई : या शहराला ‘स्वप्ननगरी’ म्हणून ओळखतात. हे शहर अतिशय उद्योगप्रिय आहे. वायुप्रदूषण ‘एक्यूआय’ निर्देशांक ६० (साधारण दर्जा) आहे. अपेक्षित जीवनमान ७१.६ वर्षे.

जगातील दहा निरोगी शहरांची व पाच खराब शहरांची यादी अशी आहे - हाँगकाँग, अशगाबात (तुर्कमेनिस्तान), टोकियो (जपान), झुरिक (स्वित्झर्लंड), सिंगापूर, न्यूयॉर्क (अमेरिका), शांघाय (चीन), बर्न (स्वित्झर्लंड), जिनेव्हा, बीजिंग (चीन).
खराब शहरांची यादी - ट्युनिस (ट्युनिशिया), विन्धोक (नाम्बिबिया), ताश्कंद (उझबेकिस्तान), कराची (पाकिस्तान).

देशातील दहा शोभिवंत शहरे

हैदराबाद :
ऐतिहासिक काळातील मोठी स्थळे व मंदिरे, बाझार, करमणुकीची स्थाने, उद्याने, बागा, खाण्याचे जिन्नस इत्यादी गोष्टींनी या शहराची शोभा वाढली आहे.


मुंबई :
या शहराला ‘बॉलीवूडनगरी’ म्हणून ओळखतात. शिवाय हे शहर देशाची आर्थिक राजधानी असून देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक या शहरात वास्तव्याला आहेत. या शहरातील अर्धी वस्ती झोपडपट्टीची असून शहरात स्वच्छ पाणी व उपनगरी रेल्वे वाहतुकीची सुविधा आहे. या शहरात अनेक वारसा स्थळे आहेत.


पुणे :
हे शहर म्हणजे शिक्षण केंद्र आहे. शिवाय तेथे आयटी हब, आश्रम, राजवाडे, म्युझियम आणि विद्यापीठे आहेत. ऐतिहासिक स्थळे आणि सुंदर रेस्टॉरंट आहेत.


बंगळुरू :
येथे प्रसन्न आणि शांत तलाव व उद्याने आहेत. येथे आयटी हब, करमणुकीची साधने, दुकाने व बाझार आहेत.


चेन्नई :
हे लोकप्रिय पर्यटन केंद्र आहे. येथे आयटी हब, संगीत केंद्र आहे. येथे वैद्यकीय सुविधेसाठी मोठे केंद्र विकसित झाले आहे.


कोलकाता :
येथे ऐतिहासिक स्थळे व देवळे खूप आहेत. अनेक खाण्याच्या जिन्नसांची दुकाने, सुंदर स्थापत्त्यकलेने बहरलेल्या इमारती आहेत.


दिल्ली :
हे शहर एक उत्तम पर्यटन केंद्र आहे आणि येथे ऐतिहासिक स्थळे, उद्याने, दुकाने व बाझार आहेत. देशाची राजधानी असल्यामुळे शोभिवंत स्थळे खूप आहेत.


जयपूर :
या शहराला ‘गुलाबी शहर’ म्हणून ओळखतात. हे उत्तम पर्यटन केंद्र आहे. येथे दुकाने व विविध बाझार आहेत. या शहरात पर्यावरणाच्या जपणुकीमुळे निसर्गबद्ध स्थळांमुळे मनाला शांतता लाभते.


कोचीन :
हे शहर किनार्‍याजवळ वसले आहे. हे एक उत्तम पर्यटन केंद्र आहे. येथे ज्वेलरीचा व्यवसाय लोकप्रिय आहे.


त्रिवेंद्रम :
हे शहर सात किमी उंचीच्या टेकड्यांवर देशाच्या नैऋत्य समुद्रकिनार्‍यावर वसले आहे. येथे विविध अशी पुरातन मंदिरे आहेत.
@@AUTHORINFO_V1@@