Video : वाड्रांना भाजपविषयी विचारला प्रश्न अन् घसरून पडली पत्रकार

    22-Feb-2021
Total Views | 141
News _1  H x W:
 


नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी सायकल चालवून निषेध केला. सोबतच पत्रकारांचा फौजफाटा घेऊन ते मुलाखत देण्यासाठी निघाले होते. मात्र, यात वाड्रांची मुलाखत घेत असताना इंडिया टुडे पत्रकार मौसुमी सिंग यांना थेट टीव्हीवर गोंधळाचा सामना करावा लागला. वाड्रा सायकलवर आहेत, म्हटल्यावर आपणही सायकल चालवूनच मुलाखत घ्यावी, असा अट्टाहास त्यांनी धरला होता. मौसुमी सिंग यांनी सायकल चालवण्याचा प्रयत्न केला मात्र, असे काहीतरी घडले की लोकांनी त्यांची थट्टा करायला सुरुवात केली.
 
 
मुलाखतीच्या दरम्यान, मौशूमीच्या हातात एक माईक होता, सायकल चालवणाऱ्या वाड्रांना त्यावेळीच प्रश्न विचारत होत्या. माईक आणि सायकलचा तोल सावरण्याच्या नादात हा सगळा प्रकार घडला. वाड्रांना प्रश्न विचारत असताना त्यांनी माईक खेचून घेण्याचा प्रयत्न केला आणि यात पत्रकार सायकलसह जमिनीवर कोसळल्या. माईकवर दाब आल्याने आवाजही मोठा झाला. हा सर्व प्रकार लाईव्ह रेकॉर्ड झाल्याने अचानक प्रेक्षकांनाही हा गोंधळ समजण्यासाठी वेळ लागला.
 
 
 
सोशल मीडियावर 0.25 सेकंदांचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मिम्स शेअर करत असताना उपहासात्मक रित्या पुडुचेरी सरकारच नव्हे तर मौसमसिंह यांचेही सरकार पडले आहे. सर्वात हास्यास्पद गोष्ट म्हणजे वापरकर्त्यांना अशी वाटते की ही घटना त्याच वेळी घडली, जेव्हा वड्रा यांना भाजपबद्दल विचारले गेले आणि दुसऱ्याच क्षणी त्याचे संतुलन बिघडले. वाड्रा यांचा हा स्टंट करत सुरू असताना त्यांच्या सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांचा वाहनांचा ताफा त्यांच्या मागेच होता.







अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121