
मुंबई : मुंबईत काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल भाजपचे चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांना नुकताच सन्मान करण्यात आला. मुंबई भाजपचे नेते आणि खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार योगेश सागर यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिण्यात आलेले पुस्तक देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, नगरसेवक कमलेश यादव, युनुस खान आणि दिलीप पंडित हे उपस्थित होते.