'वांद्रे वंडरलँड' कार्यक्रमाला अखेर स्थिगिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2021   
Total Views |
 
bandra-wonderland-new-year
 
 
 
मुंबई : मुंबईतील वाढती कोरोनास्थिती आणि ओमायक्रॉन बाधितांच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ लक्षात घेता मुंबई महापालिका प्रशासनातर्फे काही दिवसांपूर्वी शहरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, महापालिका आणि पोलीस प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवत वांद्रे येथे ख्रिसमस साजरा करण्यासाठी 'वांद्रे वंडरलँड' नामक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना नियम पायदळी तुडवत साजरा करण्यात आलेल्या या कार्मक्रमावरून वादंग झाल्यानंतर अखेरीस या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. 'एएनआय'ने दिलेल्या बातमीनुसार शहरातील वाढत्या कोरोनास्थितीचा अंदाज घेत प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
२ जानेवारीपर्यंत महोत्सव नागरिकांसाठी बंद
वांद्रे येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावरून विविध राजकीय पक्षांनी घेतलेलया आक्षेपांमुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. बुधवार, दि. २९ डिसेंबर रोजी मुंबईत सुमारे २५०० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यातच वांद्रे वंडरलँड प्रकरणामुळे सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांची आणि शहरातील रुग्णसंख्येची दखल घेत रविवार, दि. २ जानेवारी २०२२ पर्यंत हा महोत्सव नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे.
 
 
'मुख्यमंत्र्यांच्या वांद्रेत पार्ट्यांचे आयोजन'
मुंबईतील वाढत्या ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येचा अंदाज घेत पालिका प्रशासन आणि मुंबई पोलिसांतर्फे शहरात ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यावर विविध निर्बंध लावले होते. ख्रिसमस आणि नववर्षाची आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्या आणि त्यातील माणसांच्या संख्येवरही मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले होते. तथापि, मुंबईत अनेक ठिकाणी विशेषकरून मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटीजतर्फे उंची पंचतारांकित हॉटेलांमध्ये पार्ट्या आयोजित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून अनेक इमारतीही सील करण्यात आल्या होत्या. शहरात निर्बंध लावलेले असताना देखील मुख्यमंत्र्यांचे होम ग्राउंड असलेल्या वांद्रे मतदारसंघात असे आयोजन केले जात असेल तर ही बाब नक्कीच दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळे अशा प्रकारचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता विविध सामाजिक संस्था आणि राजकीय मंडळींकडून केली जात आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@