कोल्हापूर - शाहूवाडीत ६० हेक्टर वनक्षेत्रावर बाॅक्साईट' मायनिंगला परवानगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2021   
Total Views |
sahaydri _1  H


मुंबई (अक्षय मांडवकर) - पश्चिम घाटाच्या (sahyadri) पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राला लागून असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ६० हेक्टर राखीव वनक्षेत्र बाॅक्ससाईट खाणकामासाठी वळते करण्यात येणार आहे. शाहूवाडी तालुक्यातील पठार (सडा) पट्ट्यातील हे राखीव वनक्षेत्र खाणकामासाठी वळते करण्यासाठी वन विभागाने हिरवा झेंडा दाखवला असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडूनही त्यास प्रथम टप्प्यातील परवानगी मिळाली आहे. खाणकामाचे हे क्षेत्र पश्चिम घाटाचे (sahyadri) पर्यावरणीय क्षेत्र आणि व्याघ्र भ्रमणमार्गालगत असून 'विशाळगड काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'पासून काही किलोमीटर अंतरावर आहे.
 
 
शाहूवाडी तालुक्यातील ६० हेक्टर राखीव वनक्षेत्र बाॅक्ससाईट खाणकामाकरिता वळते करण्यासाठी वन विभाग आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. यासंदर्भातील परवानगी पत्र दै. 'मुंबई तरुण भारत'ला (महा MTB) मिळाले आहेत. शाहूवाडीमधील घुंगूर, आंबर्डे, परळी आणि सावर्डे बी.के या गावातील पठार पट्ट्यामध्ये खाणकाम सुरू होणार आहे. यासाठी घुंगूरमधील ४.४० हेक्टर, आंबर्डेतील ३ हेक्टर, सावर्डे बी.केमधील १३ हेक्टर आणि घुंगूर-आंबर्डेमधील ३४.६० हेक्टर राखीव वनक्षेत्र वळते करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वन कक्षाकडून राखीव वनक्षेत्र वळते करण्यासंदर्भातील परवानगी तीन खाण कंपन्यांना मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे खाणकामांना परवानगी देण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये या परिसरात वन्यजीवांचा वावर नसल्याची नोंद केली आहे.  (हे सर्वेक्षण अहवाल दै. 'मुंबई तरुण भारत'कडे उपलब्ध आहेत). मात्र, राज्य सरकारने वर्षभरापूर्वी घोषित केलेले विशाळगड आणि पन्हाळगड काॅन्झर्वेशन रिझर्व्हचे वनक्षेत्र या परिसरातील वनक्षेत्राशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे या पठार क्षेत्रात गवे, बिबटे आणि खवले मांजरासारख्या 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत प्रथम श्रेणीत संरक्षित असणाऱ्या प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता आहे. (sahyadri)

( शाहूवाडीत याठिकाणी मायनिंगला परवानगी)
 
shahuwadi _1  H
 
 
 
महत्त्वाचे म्हणजे खाणकामासाठी परवानगी मिळालेले हे क्षेत्र पश्चिम घाटाच्या (sahyadri) पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राला लागूनच आहे. या क्षेत्राला लागून असलेल्या सोनुर्ली गावाचा पश्चिम घाटाच्या (sahyadri) पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात समावेश आहेच. शिवाय 'राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणा'ने नोंदवलेल्या 'चांदोली-राधानगरी-गोवा' या व्याघ्र भ्रमणमार्गतही या गावाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत हे क्षेत्र खाणकामासाठी वळते करण्यासंदर्भात शंका उपस्थित करण्यात येत आहे. तसेच खाणकामासाठी परवानगी मिळालेल्या राखीव वनक्षेत्राचा भूभाग 'विशाळगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह'ला जोडणारा आहे. अशा परिस्थितीत त्यावेळी हे राखीव वनक्षेत्र त्यामध्ये का नाही समाविष्ट करण्यात आले ? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पठार म्हणजेच सडे हे वरकरणी निर्जीव वाटत असले तरी पाणी धरुन ठेवण्याबरोबरच प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या संवर्धनासाठी ते महत्त्वाचे आहेत. (sahyadri)
 
 पठारांचे (सडा) महत्व  काय ?
  
@@AUTHORINFO_V1@@