डोंबिवली : कामा असोसिएशनतर्फे उद्योजकांसाठी प्रक्रिया सुरक्षितता या मार्गदर्शनपर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला उद्योजकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
कामा असोसिएशनच्या सभागृहात या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कामा, फॅक्टरी इनस्पेक्टर या सगळ्य़ासाठी महिन्यातून एका शिबीराचे आयोजन केले जाते. आता र्पयत सहा ते सात विभागात हे शिबीर घेण्यात आले आहे अशी माहिती कामाचे अध्यक्ष डॉ. नारायण टेकाडे यांनी दिली.
देवेन सोनी म्हणाले, या शिबीराचा अनेकांना फायदा झाला आहे. त्यामुळे अनेक दुर्घटना टाळता आल्या आहेत. डोंबिवली, अंबरनाथ,बदलापूर येथून 88 उद्योजकांनी सहभाग घेतला आहे. या शिबीरात केमिकल हॅण्डलींग सेफ्टी इलेक्ट्रीक्ल सेफ्टी अशा विविध सेफ्टीवर मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार ते सुधारणा करतात. त्यांचा उद्योजकांना फायदा होतो. कामातर्फे हे शिबीर सर्वासाठी मोफत असते. तसेच या शिबीरात सहभागी होणा:या प्रत्येकाला असोसिएशनतर्फे एक प्रमाणपत्र देण्यात येते. त्यामुळे त्यांनी या शिबीराचा लाभ घेतला असल्याचा रेकार्ड त्यांच्याकडे आणि कामाकडे अशा दोघांकडे असतो असे सांगितले.
या शिबीराला डॉ. नारायण टेकाडे, डॉ. देवेन सोनी, डॉ. मुरली अय्यर, डॉ. राज बैल्लूरे, डॉ. उदय वालावलकर, डॉ. कमल कपूर, डॉ. चांगदेव कदम, डॉ. जयवंत सांवत आदी उपस्थित होते.
------------------------------
-------------------------------