दिल्ली - अक्षय ऊर्जा निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने (AGEL) सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) सोबत जगातील सर्वात मोठा वीज खरेदी करार (PPA) केला आहे.
अदानी समूहाने दिलेल्या निवेदनात माहिती दिली आहे की, “4,667 मेगावॅटचा पुरवठा करण्यासाठी AGEL करार हा SECI द्वारे जून २०२० मध्ये AGEL ला देण्यात आलेल्या ८ हजार मेगावॅटच्या उत्पादन-लिंक्ड सोलर टेंडरचा एक भाग आहे. ज्याने जगातील सर्वात मोठा सोलार बनण्याचा विक्रम केला आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही या घडामोडींची पुष्टी करण्यासाठी ट्विटरवर लिहले आहे की, “जगातील सर्वात मोठे सौर ऊर्जा विकासक बनल्यानंतर, अदानी ग्रीनने SECI सोबत ४,६६७ मेगावॅटचा पुरवठा करण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या ग्रीन पॉवर खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे भारताच्या आरई फूटप्रिंटला गती मिळेल आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत उत्पादनाला चालना मिळेल. जय हिंद."
"COP 26 मधील कार्यवाहीनंतर, हे स्पष्ट होत आहे की, जगाला पूर्वीच्या अपेक्षेपेक्षा कमी कार्बन अर्थव्यवस्थेकडे समानतेने संक्रमण करावे लागेल. म्हणूनच अदानी समूहाने अक्षय्य क्षेत्रात ५० ते ७० अब्ज अमेरिकन डाॅलरच्या गुंतवणुकीचे वचन दिले आहे. हा करार आम्हाला २०३० पर्यंत अक्षय उर्जा तयार करणारे जगातील सर्वात मोठा उद्योगसमूह होण्याच्या वचनबद्धतेच्या मार्गावर आणतो,” असे गौतम अदानी यांनी एका निवेदनात म्हटले होते. आत्तापर्यंत, AGEL ने SECI सोबत एकूण 6000 MW हरित उर्जा निर्मितीसाठी करार केला आहे. उर्वरित २ हजार मेगावॅटच्या करारावर येत्या दोन ते तीन महिन्यांत शिक्कामोर्तब होईल. फर्मकडे एकूण 20.3 GW चा कार्यरत आणि बांधकामाधीन वीज निर्मिती पोर्टफोलिओ आहे. AGEL ने २०१५ पर्यंत फ्रान्सच्या एकूण 25GW ग्रीन पॉवर निर्मितीसाठी करार केला आहे. $2.5 बिलियनच्या गुंतवणुकीसाठी, 'टोटल'ने AGEL मधील २० टक्के हिस्सा विकत घेतला आहे.