जितेंद्र त्यागींना जोडे मारणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस; 'एमआयएम'च्या नेत्याकडून घोषणा

    13-Dec-2021
Total Views | 60
mim _1  H x W:



दिल्ली -
शिया मुस्लिम वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी उर्फ ​​जितेंद्र नारायण त्यागी यांनी इस्लामचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारल्यापासून कट्टरपंथियांकडून त्यांना सतत लक्ष्य करण्यात येत आहे. त्यांच्या विरोधात फतवे काढले जात आहेत आणि त्यांच्या डोक्यावर बक्षीस ठेवली जात आहे. याच क्रमाने पुन्हा एकदा जितेंद्र नारायण त्यागी यांच्या डोक्यावर बक्षीस ठेवत, जो कोणी त्यांना जोडे मारेल, त्याला ११ लाखांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.



उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएम) महानगर अध्यक्ष वाकी रशीद यांनी जितेंद्र नारायण त्यागी यांच्यासंदर्भातील ही घोषणा केली आहे. रशीदच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये 'एआयएमआयएम' नेते जितेंद्र नारायण त्यागी यांना समाजकंटक म्हणून संबोधताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये रशीद म्हणतात, “वसिम रिझवी सारख्या लोकांना समाजात फूट पाडून हिंदू-मुस्लिम फूट पाडायची आहे. हे सर्व ते एका षड्यंत्राखाली करत असल्याचे दिसते. अशा लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. त्यामुळेच आम्ही सांगितले होते की, जो कोणी त्याला जोडे मारेल त्याला ११ लाख रुपये दिले जातील."





रशीद पुढे म्हणाले, "वसीम रिझवीवर अनेक गुन्हे दाखल आहेत, परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही आणि त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकावा अशी आमची इच्छा आहे. वसीम रिझवी यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर एक पुस्तक लिहिले आहे, त्याबद्दल आम्ही राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे." जितेंद्र नारायण त्यागी यांच्या विरोधात कट्टरपंथियांकडून आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी वसीम रिझवी यांनी ६ डिसेंबर रोजी हिंदू धर्म स्वीकारला तेव्हा हैदराबादचे काँग्रेस नेते मोहम्मद फिरोज खान यांनी त्यांच्या डोक्यावर ५० लाखांचे बक्षीस ठेवले होते. फिरोज खान यांच्यानंतर काँग्रेसचे आणखी एक नेते आणि तेलंगणातील आमदार राशिद खान यांनीही रिझवीचा शिरच्छेद करण्यासाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121