नवी दिल्ली : दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार आणि नवी दिल्ली प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी शुक्रवारी केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी किरण शेलार यांनी रावसाहेब पाटील दानवे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ प्रकाशित ‘कालजयी सावरकर’ हे पुस्तक भेट म्हणून दिले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी भारतीय रेल्वेचा ईशान्य भारतात होत असलेला विस्तार आणि ईशान्य भारताचा वेगवान विकास याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे ‘प्रसारमाध्यमांची सद्यस्थिती व भविष्य’ याविषयीदेखील त्यांनी चर्चा केली.