पॅरिस: फ्रान्समधील चर्चचे पाद्री गेली अनेक वर्ष धर्मकार्याच्या नावाखाली लहानग्यांवर लैंगिक अत्याचार करत. या कृत्यांवरील वाढत्या विरोधामुळे तिथल्या चर्चने अखेर सर्वांची माफी मागितली. गेल्या ७० वर्षात सुमारे ३,३०,००० मुलांवर चर्चमधील पाद्री आणि इतर धर्मनेत्यांनी लहानग्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.
या पीडितांना चर्च आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देणार. सोमवारी झालेल्या फ्रान्स कॅथॉलिक चर्चच्या बैठकीत धर्म संस्थेच्या प्रमुखांनी तशी कबुली दिली. "पिडीतांनी भोगलेल्या यातनांबद्दल आम्हाला शरम वाटते. त्या बाबतीत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो", असे ते म्हणाले. चर्चमधील लोकांकडून होणाऱ्या चुकीच्या कृत्यांवर जरब बसवणं चर्च संस्थेची नैतिक जवाबदारी आहे. मात्र, आर्थिक नुकसानभरपाई देणार असल्याचे म्हटले तरी नेमकी किती रक्कम देणार हे चर्चने अद्याप स्पष्ट केले नाही.