बीजिंग: चिनी सैन्याने अमेरिकी पद्धतीच्या युध्दनौका बांधल्याचे समोर येत आहे. अमेरिकी युद्धनौके सारख्या बांधलेल्या या युद्धनौका मात्र चीनच्या ताफ्यात आहेत. विशेष म्हणजे या युद्धनौका समुद्रात नसून चीनच्या शिनजिआंग वाळवंटात आहेत.
या युद्धनौका 'लढाऊविमान वाहक' पद्धतीच्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या चित्रांमध्ये लढाऊ विमानाची धावपट्टी स्पष्ट दिसत आहे. वाळवंटात ठेवलेल्या या युद्धनौका चिनी सैन्याला अमेरिकेविरोधात लढाई प्रशिक्षणासाठी बनवल्या गेल्याचे म्हटले जाते.
तैवान मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन आमनेसामने भिडण्याचे राजकीय चित्र गेल्या महिनाभरापासून दिसत आहे. जर अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध झाले तर ते दक्षिण चीन समुद्रात होईल. याचीच तयारी म्हणून, चीनचे नौदल अमेरिकी बनावटीत असणाऱ्या या युद्धनौकांवर सराव करीत आहे. 'मक्सार'ने प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट इमेजेसमधून चीनचा हा डाव समोर आला.