भारतीयांसाठी आनंदवार्ता: 'कोवॅक्सिन'ची 'शेल्फलाईफ' आता १२ महिने

    04-Nov-2021
Total Views |

COVAXIN_1  H x
 
 
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवणारी 'कोवॅक्सिन' पहिली भारतीय लस ठरली आहे. या लसीची शेल्फ लाईफ आता १२ महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. 'सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने कोवॅक्सिन च्या शेल्फ लाईफ ला ६ वरून १२ महिन्यांपर्यंत वाढवली आहे.'- अशी माहिती कोवॅक्सिनचे उत्पादक भारत बायोटेक यांनी दिली.
 
 
या लसीची एक्सपायरी डेट मॅनुफॅक्चरिंग पासून १२ महिन्यांची असेल. कोरोनावर प्रभावी म्हणून कोवॅक्सिनची शेल्फ लाईफ पूर्वी ६ महिने होती. जी नंतर ९ महिन्या पर्यंत वाढवली गेली. ऍडिशनल स्टॅबिलिटी डेटा (अतिरिक्त स्थिरता माहिती) रिपोर्टच्या आधारे कोवॅक्सिनचे शेल्फ लाईफ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत बायोटेक नी माहिती त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून दिली. बुधवारीच कोवॅक्सिन ला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळाली.