नवी दिल्ली : “तुम्ही मला सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा देऊ नका. मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत जायची इच्छा नाही. मला केवळ सेवेत राहायचे आहे. माझ्यासाठी पंतप्रधान पद या सर्व गोष्टी सत्तेसाठी नाहीच, तर सेवेसाठी आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधला. यावेळी एका हृदयविकार रुग्णासोबत संवाद साधताना त्यांनी मला सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा देऊ नका, असे सांगितले. राजेश कुमार प्रजापती या रुग्णाने पंतप्रधान मोदींचे आयुष्यमान भारत योजनेसाठी कौतुक करताना त्यांना कायम सत्तेत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावर मोदी यांनी म्हटले की, “मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही सत्तेत जायची इच्छा नाही. मला केवळ सेवेत राहायचे आहे. माझ्यासाठी पंतप्रधान पद या सर्व गोष्टी सत्तेसाठी नाहीच, तर सेवेसाठी आहेत,” असे सांगितले.