संमेलनस्थळी स्वा. सावरकरांच्या नावे ‘एम्फीथिएटर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2021   
Total Views |

savrkar 2_1  H


 नाशिक : 
नाशिक येथे आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला, व्यासपीठाला स्वा. वि. दा. सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी समाजातील सर्वच घटकांतून होत होती. या मागणीच्या रेट्यापुढे झुकत संमेलनस्थळी असलेल्या ‘एम्फीथिएटर’ला स्वा. सावरकर यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वगाताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ संमेलनात स्वा. सावरकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीचे निवेदन घेऊन भुजबळ यांना भेटावयास गेले असता या शिष्टमंडळाला त्यांनी ‘एम्फीथिएटर’ला स्वा. सावरकर यांचे नाव देण्यात येणार असल्याचे सांगितले.







याबाबत ‘मनसेच्या मागणीला यश’ अशा मथळ्याखाली मनसेच्यावतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकात माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या या निर्णयावर मनसे समाधानी आहे का, असा सवाल भेडसावत आहे. मनसेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार भुजबळ यांनी जाहीर केलेल्या भूमिकेबाबत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने स्वा. सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूर येथून सावरकरप्रेमींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, ‘एम्फीथिएटर’ला नाव ही स्वा. सावरकर यांची शुद्ध बोळवण असल्याची भावना मांडत संताप व्यक्त करत निषेध करण्यात आला. मराठी साहित्यात स्वा. सावरकर यांचे बहुमोल योगदान असताना संमेलनस्थळी स्वा. सावरकरांच्या नावे ‘एम्फीथिएटर’





एम्फीथिएटर’ला नाव देऊन स्वा. सावरकर यांचा अपमान केला जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच, साहित्य संमेलनात ’एम्फीथिएटर’ला स्वा. सावरकर यांचे नाव देणे म्हणजे हे साहित्याचे संमेलन आहे की, चित्रपट महोत्सव हे आयोजकांनी स्पष्ट करावे, अशी संतप्त भावना यावेळी बोलून दाखविण्यात आली.२०१४ पर्यंत भारतात केवळ गांधी-नेहरू यांचाच इतिहास आणि तेच राष्ट्रपुरुष असल्याचे लोकांना माहीत होते.







स्वा. सावरकर यांचा कायम अपमान करण्यात आला. भगूर येथे स्वा. सावरकर स्मारक होऊ नये म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रयत्न केले. मात्र, आता स्वा. सावरकर हे कायम चर्चेत आहेत. त्यांचे लिखाण व विचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत. अशा प्रकारे त्यांना डावलून त्यांचे महत्त्व कमी होणार नाही, अशी भावना यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अखिल केंद्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथ शेटे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडे व्यक्त केली. भुजबळ यांचा हा निर्णय जनतेपर्यंत पोहोचल्यावर शहरातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.



“हे सर्व भुजबळांचे कारस्थान!

नाशिक येथील साहित्य संमेलनाचे सर्वेसर्वा पालकमंत्री छगन भुजबळ आहेत. त्यांना असे वाटते की, स्वा. सावरकर यांना मोठे केले, तर आपले महत्त्व कमी होईल. मात्र, भुजबळांची ओळख ते सत्तेत आहे म्हणून आहे. स्वा. सावरकर यांची ओळख त्यांचे कार्य, त्याग, विचार, लिखाण यामुळे आहे. त्यांनी साहित्याचे सर्व प्रकारात लिखाण केले आहे. तरीही स्वा. सावरकर यांच्या नावाला विरोध होतो, हे अनाकलनीय आहे. स्वा. सावरकर हे घराघरात पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांचे महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही. ‘एम्फीथिएटर’ला स्वा. सावरकर यांचे नाव देणे म्हणजे ही त्यांची शुद्ध बोळवण आहे.”







 
@@AUTHORINFO_V1@@