प्रमोद महाजन कला उद्यान प्रकल्प पुन्हा चर्चेत

उदंचन प्रकल्पाच्या खर्चात पुन्हा वाढ

    20-Nov-2021   
Total Views |

pramod mahajan park_1&nbs 
 
 
 
मुंबई : हिंदमाता आणि नजीकच्या परिसरात निर्माण होणाऱ्या पुरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दादर पश्चिमेतील प्रमोद महाजन कला उद्यान येथे बांधण्यात येत असलेलया भूमिगत टाक्यांचा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हिंदमाता आणि संबंधित परिसरात पावसाचे पाणी जमा होते व त्यातून जनजीवन विस्कळीत होण्याचे प्रकार दरवर्षीच्या पावसाळ्यात घडतात. यावर उपाय म्हणून बांधण्यात येत असलेल्या या टाक्यांच्या प्रकल्पावर सुरुवातीपासूनच स्थानिकांसह लोकप्रतिनिधींनी आक्षेप नोंदवले होते. विनानिविदा थेट कंत्राटदाराची नियुक्ती करून सुरु करण्यात आलेल्या या बांधकामाला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकल्पासाठी अतिरिक्त २७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने या प्रकल्पाभोवती पुन्हा एकदा वादाचे संकट घोंघावत आहे.
 
 
 
याबाबत बोलताना महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले की, "बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मध्य मुंबईतील हिंदमाता परिसरात पूर येऊ नये म्हणून शहरातील पहिल्या भूमिगत पाण्याच्या टाकीवर अतिरिक्त २७.०७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. दादर पश्चिमेकडील प्रमोद महाजन पार्कच्या खाली पाण्याची टाकी बांधण्यासाठी हा निधी खर्च केला जाईल, असे पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
 
 
 
पावसाळ्यात नेहमीप्रमाणे हिंदमातेला पूर येऊ नये म्हणून प्रशासनातर्फे पावसाचे पाणी साठवण्यासाठी भूमिगत पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम हाती घेतले होते. महापालिकेने गेल्या वर्षी दादर येथील प्रमोद महाजन पार्क आणि परळ येथील सेंट झेविअर मैदान येथे दोन भूमिगत टाक्या बांधण्याचा प्रकल्प सुरु केला आहे. तसेच हिंदमाता उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या जागेत पंपांच्या सहाय्याने नव्याने टाकलेल्या पाईपलाईनच्या जाळ्यातून दोन्ही साठवण टाक्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी पंपिंग स्टेशन बांधण्यात आले आहे.
 
 
 
पालिकेतील प्रस्तावानुसार , महापालिका प्रशासनाने प्रमोद महाजन पार्कच्या खाली टाकी बांधण्यासाठी नव्याने निविदा मागवल्या नाहीत आणि दादर आणि धारावीमधील स्ट्रॉमवॉटर ड्रेन आउटफॉलवर दुरुस्ती आणि बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला कंत्राट दिले. स्ट्रॉम वॉटर ड्रेन आउटफॉल प्रकल्पासाठी नागरी संस्थेला 44.04 कोटी रुपये खर्च आला आहे. आता याच कंत्राटदाराला भूमिगत टाकीचे काम पूर्ण करण्यासाठी २७.०७ कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय पालिका प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. यामुळे प्रकल्पाची किंमत आता 71.12 कोटी रुपये झाली आहे. जलकुंभ प्रकल्पासाठी अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे.
 
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
Mock Drill India : देशभरात युद्धाचे

Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

Mock Drill India : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ..