देशाला स्वातंत्र्य २०१४लाच ; विक्रम गोखले मतावर ठाम

माध्यमांनी माझ्या भाषणाचा विपर्यास केला : विक्रम गोखले

    19-Nov-2021
Total Views |

vikram gokhle_1 &nbs


मुंबई
: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रानौतने 'देशाला खरे स्वातंत्र्य हे २०१४ला मिळाले,' असे वक्तव्य केले होते. यानंतर अभिनेते विक्रम गोखलेंनी देखी तिच्या या वक्तव्याचे समर्थन केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रात मात्र त्यांच्यावर टीका करण्याचे सत्र सुरु झाले. यावर आता खुद्द अभिनेते विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन टीकाकारांना उत्तर दिले आहे. 'मी माझ्या मतांवर ठाम असून माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला,' असे त्यांनी म्हंटले आहे.
 
 
विक्रम गोखले यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले की, "२०१४ पासून देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, हे माझे प्रामाणिक मत आहे. मी त्यावर ठाम असून ते बदलणार नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला नाही. मूळ भाषणात मी काय बोललो ते दाखवण्यात आलेले नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांची मुलगी नेहा गोखले हीदेखील सोबत उपस्थिती होती. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मी तिला आणले आहे, असे त्यांनी सुरुवातीलाच सांगितले.
 
 
प्दुहे ते म्हणाले की, "कंगना रणौतने व्यक्त केलेली तिची मते वैयक्तिक आहेत, माझीही वैयक्तिक आहेत. तिने तसे वक्तव्य केले, यामागे तिला तिची काही कारणे असतील. तसेच, मी त्याला दुजोरा दिला, याला माझी काही वेगळी कारणे आहेत. माझी तिची अशी वैयक्तिक ओळख नाही ना आमचा कधी संबंध आला. मात्र, माझी राजकीय अभ्यासाशी ओळख आहे. १८ मे २०१४चा 'गार्डियन' हे वर्तमानपत्र वाचा. त्यामध्ये जे लिहिले गेले आहे, तेच कंगना बोलली आहे. ती काही चुकीचं म्हणाली नाही एवढंच मी म्हणालो. मी त्या मतावर आजही ठाम आहे."
 
 
पुढे ते म्हणाले की, "२०१४ पासून भारताने जागतिक पटलावर सक्षमपणे उभे राहायला सुरुवात झाली. मी तोंडफाटका माणूस आहे. मला ओठ शिवता येत नाहीत. त्यामुळंच माझी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नाही. गेल्या ३० वर्षांत मला अनेक राजकीय पक्षांचे निरोप आले, पण मी गेलो नाही. माझ्या मूळ भाषणात मी काय बोललो हे दाखवलं गेलेलं नाही. मी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला असं कुणाला वाटत असेल तर 'दे दी हमे आजादी बिना ढाल' हे गीत म्हणताना, ज्यांची अवहेलना झाली त्यांचं काय? तेव्हा आपल्याला शरम वाटली नाही का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.