मुंबई : सध्या गँगस्टर रियाज भाटी हा चांगलाच चर्चेत आहे. रियाझवर स्वतःच्या पत्नीला सेक्स वर्कर बनवल्याचाही आरोप आहे. रियाझची पत्नी रेहनुमा हिने आरोप केला आहे की, तिचा पती तिला हायप्रोफाईल लोकांसोबत झोपण्यासाठी जबरदस्ती करत होता. तिने आपल्या तक्रारीमध्ये हार्दिक पांड्या, मुनाफ पटेल, राजीव शुक्ला यांचीदेखील नावे घेतली आहेत. तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जवळचा मानला जातो. त्यामुळे आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
रियाझ भाटीची पत्नी रेहनुमा भाटी हिने आरोप केले आहेत की, तिला हाय प्रोफाईल लोकांसोबत सेक्स करण्यास भाग पाडले गेले. यासाठी तिचा पती रियाजने तिच्यावर दबाव टाकला होता. रेहनुमा भाटी यांच्या आरोपांमध्ये काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांचेदेखील नाव आले.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाझ भाटी २०१५ आणि २०२०मध्ये न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा करून देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली होती. त्यासाठी रियाझने बनावट पासपोर्टचा आधार घेतला होता. फेब्रुवारी २०२०मध्ये तो परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, मुंबई विमानतळावर त्याला पकडण्यात आले. त्याच्यावर जमीन बळकावणे, फसवणूक करणे, गोळीबार करणे, खंडणी मागणे असे गुन्हे दाखल आहेत.
याच वर्षी सप्टेंबरमध्ये न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून तो फरार आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली. २००६ मध्ये त्याने मुंबईतील मालाड येथील जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यासाठी दाऊद इब्राहिम टोळीच्या सदस्यांची मदत घेतली. त्याच्यावर जुहू आणि आंबोली पोलिस ठाण्यात खंडणीचे गुन्हेही दाखल आहेत. रियाझ भाटीला राजकारण्यांसोबत फोटो काढण्याची आवड असल्याचेही अनेकदा समोर आले. त्यांचा फोटो जवळपास प्रत्येक पक्षाच्या नेत्यांसोबत दिसतो.
२०१०मध्ये रियाझ भाटी विरोधात मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रियाझने एका बिल्डरवर अंधेरीतील एका प्रकल्पातून बाहेर पडण्यासाठी दबाव टाकला. रियाझचे नाव मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ सहायक निरीक्षक सचिन वाजे यांच्याशीही जोडले गेले आहे. रियाझ बारमधून पैसे उकळत असे. सचिन वाजे यांच्या आश्रयाने तो ही वसुली करायचा.