साजिद नाडियाडवालाने राष्ट्रीय पुरस्कार सुशांत सिंह राजपूतला केला समर्पित

    26-Oct-2021
Total Views |

Sushant_1  H x
मुंबई : साजिद नाडियाडवालाचा चित्रपट छिछोरेसाठी मिळालेला सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला समर्पित केला. या सद्भावनेचे सुशांतच्या चाहत्यांनी स्वागत केले असून चाहत्यांनी साजिदचे कौतुक केले आहे. सुशांत सिंह राजपूत अभिनीत आणि नितेश तिवारी दिग्दर्शित 'छिछोरे'ला वर्षातील सर्वाधिक पसंती लाभलेला चित्रपट असून ६५वा फिल्मफेयर पुरस्कारमध्ये चित्रपटाला पाच नामांकने मिळाले होती. ज्यामध्ये सर्वोत्त्कृष्ट चित्रपट, सर्वोत्त्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्त्कृष्ट कथा, सर्वोत्त्कृष्ट संवाद आणि सर्वोत्त्कृष्ट संपादन याचा समावेश होता.
 
 
 
 
 
 
 
चित्रपटाला अनेक गोष्टींसाठी नावाजण्यात आले होते. सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपटासाठी ६७वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याबद्दल, निर्माता साजिद नाडियाडवालाने छिछोरेच्या संपूर्ण टीमला धन्यवाद दिले. विशेष म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या 'लविंग मेमरी' हा पुरस्कार समर्पित केला, जो भारतातील अनोख्या प्रतिभांपैकी एक आहे. यासोबतच, येत्या महिन्यांमध्ये निर्मात्यांकडून आपल्या प्रेक्षकांसाठी खूप काही असणार आहे. नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट ने नुकतेच तडप, अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे, रणवीर सिंहसोबत ८३ आणि टाइगर श्रॉफसोबत हीरोपंती २ यांच्यासोबत आपल्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या घोषणा केल्या आहेत.