भाजपच्या 'मराठी कट्टा' या संकल्पनेचा शुभारंभ गिरगावातून सोमवारी ११ ऑकटोबर रोजी झाला. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या दृटीने या मराठी कट्ट्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. हि संकल्पना आणि त्यादृष्टीने भाजपची रणनीती जाणून घेण्यासाठी दै. मुंबई तरुण भारतने या उपक्रमाची धुरा सांभाळणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्याशी साधलेला संवाद.
मराठी माणसाला त्याच्या व्यथा मांडायचं एकमेव व्यासपीठ
'मराठी कट्टा' ही मुळात आमचे नेते देवेंद्रजींची संकल्पना आहे. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाशी आपण बोलावं आणि प्रामुख्याने त्यांचं ऐकावं हा हेतू आहे. आज मराठी माणसाची मुंबईत जी परिस्थिती आहे त्याविषयी बोलायला आवाज उठवायला भाजपकडून त्यांना एक व्यासपीठ तयार करून द्यावं या हेतूने हा मराठी कट्टा आम्ही मराठी माणसासाठी आणतोय. देवेंद्रजींच्या उपस्थितीत गिरगावातून आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांतून प्रेरणा घेत आम्ही मराठी कट्टा सुरु केला आहे. आता पुढचा प्रवास २२७ वार्ड पर्यंतचा आहे. प्रतयेक वार्डमध्ये जाऊन मराठी माणसाशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे, म्हणून हा कट्टा सुरु झालाय.
मराठी माणसाची थट्टा आम्ही नाही शिवसेनेने केलीय
राजकारण आणि निवडणूक जर डोळ्यासमोर ठेवल्या तर यात गैर काय आहे? शिवसेनेनं एक विचार करायला हवा ३५ वर्षे मराठी माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतो आहे. वर्षानुवर्षे त्यांना महापालिकेत सत्ता देतोय. एका बाजूला शिवसेनेला प्रतिष्ठा मिळतेय, सत्ता मिळतेय, शिवसनेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना पद मिळत आहेत. मात्र त्याच्या समोर मराठी माणसाला काय भेटलं आहे? मराठी माणसू आज कुठे आहे? मराठी माणसाची परिस्थिती आज काय आहे? मराठी माणूस आज २००-३०० स्क्वे. फुटांचं घर विकत घेऊ शकतो का? त्याला मुंबईत राहणं परवडत आहे का? मुंबई मोठे टॉवर होत आहे त्यांच्याकडे बघण्याशिवाय मराठी माणूस काय करू शकतो? आपल्या स्वतःच्या हक्काचं घर सोडून, चाळ सोडून त्याजागी होणाऱ्या टॉवरमध्ये राहू शकेल एवढी क्षमता मराठी माणसाची तयार झाली का? मग एवढी वर्ष शिवसेना मराठी माणसासोबत काम करून मराठी माणसाला आर्थिक सक्षम पण करू शकली नाही. ३२ वर्षाचा हिशोब जर नजरेसमोर ठेवला तर मराठी माणूस मुंबईत राहिला किती आहे? आकडेवारी जर पहिली तर शिवसेना ही संघटना मराठी माणसासाठी आहे असे स्वीकारलं तर मुंबईतील मराठी माणूस १४ ते १५ टक्केच का उरला आहे? ६० टक्के ७१० टक्के वर का वाढला नाही? मुंबईतील मराठी माणूस वसई, विरार, बदलापूरकडे का गेला? मुंबईत होणाऱ्या टॉवरमध्ये मोठं घर घेऊन राहावं का वाटलं नाही?त्यामुळे मराठी माणसाची थट्टा आम्ही करतोय की त्यांनी केली आहे? याच उत्तर आता येणाऱ्या काळात जनतेनेच शिवसेनेला मतदानाच्या माध्यमातून दिलं पाहिजे आणि ५ वर्षे भारतीय जनता पक्षाला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी.
महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीचे आभारच
महाविकास आघाडीच्या नेत्याचे महाराष्ट्र बंदीसाठी मी आभारच मानेल. याच कारण असं आहे की कालच्या पूर्ण बंदच्या नंतर जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल जो राग वाढलेला आहे, जनसामान्यांना महाविकास आघाडीने जो त्रास दिलेला आहे त्याचा थेट फायदा उद्या भाजपला होणार आहे. कारण सामान्य जनतेला, रिक्षाचालकांना, व्यापाऱ्यांना अक्षरशः लाठ्या काठ्या मारलेल्या आहेत, बेस्टच्या ८ बस जळालेल्या आहेत म्हणजे उत्तरप्रदेशमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध आपल्याला इथे करायचा आहे आणि इथे काही घटना घडली की मग मुख्यमंत्री बोलतात तुमचा कुटुंब तुमची जबाबदारी. ही जबाबदारी घ्यायला मुख्यमंत्री तयार नाहीत. योगी आदित्यनाथ आणि उत्तरप्रदेश कडून काही घ्यायचंच असेल तर मग तेथे होणारे हिंदू सण, तिथला हिंदू समाजाला संरक्षण आणि प्रतिष्ठा देण्याचं काम योगी करत आहेत त्याच अनुकरण तुम्ही का करत नाहीत? ज्या घटनेचा निषेध करत आहात त्यात योग्य कायदेशीर कारवाई झालेली आहे. आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, विद्यार्थ्यांची परिस्थिती काय आहे? राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडत चालली आहे. त्याबद्दल राज्य सरकार काहीच बोलत नाही. आज महाराष्ट्रातील हिंदू माणूस धोक्यात आलेला आहे. त्याला चहुबाजूनी घेरण्याची काम सुरु आहे. हिंदू सण, हिंदू संस्कृती हे संपवण्याचे काम महाविकास घडीच्या माध्यमातून राजरोसपणे सुरु आहे.
बेळगावात जो सत्ताबदल झाला तसाच मुंबईत होणार
भारतीय जनात अपक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. भाजपत सर्व धर्मीय नेते, पदाधिकारी एकत्रित कार्यरत आहेत. आता सर्वाना योग्य प्राधान्य दिलं पाहिजे त्यादृष्टीने हा मराठी कट्टा सुरु करण्यात आला आहे. उत्तर भरतोय समाजसाठी चौपाल हा विषय सुरु झालेला आहे. म्हणजे सगळ्या समाजाला भाजप हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या भागाचा जर विकास हवा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाहीये. आज पंतप्रधानांच्या माध्यमातून देशाचा विकास होत चालला आहे. आज भारत महासत्तेकडे वाटचाल करतो आहे. कोरोनाच्या काळातही मोदी साहेबांच्या माध्यमातून जे काम होत आहे त्यामुळे देशाने नाव जगभरात आदराने घेतलं जात आहे. म्हणून सामान्य नागरिकाला ठाम कळलेलं आहे माझा आणि माझ्या कुटुंबाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आपण पाहिलं की बेळगावात मराठी अस्मितेच्या नावाने इकडचे लोक तिकडे गेलेले त्यांना लाथ मारून इकडे पार्ट पाठवून दिलेलं आहे.मतदानाच्या माध्यमातून जनतेने उत्तर दिलेलं आहे की आम्हाला इथे फक्त भाजपचं पाहिजे. खरी मराठी अस्मिता जोपासायची असेल आणि विकास सध्याचा असेल तर भाजपहाच पर्याय आहे. त्याचंच अनुकरण येत्या काळात मुंबईत घडणार आहे फक्त निवडणुका होईपर्यंत थांबा !
मराठी कट्ट्यावर भाजपच्या केंद्रीय नेत्यांसह अनेक दिग्गज येणार
या कट्ट्यात येत्या काळात आमचे सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, सन्माननीय राणे साहेब येणार आहेत. ज्यांची जायची नाळ येथील मराठी माणूस आणि मुंबईकरांशी जोडलेली आहे असे सर्व नेते या कट्ट्यावर उपस्थित असतील. आमचे नेते आणि जनता यांच्यात संवाद यामाध्यमातून साधला जाईल. एकंदरीत हिंदू समाज असेल, मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती याचं उत्तम व्यासपीठ म्हणून मराठी कट्टा येत्या काळात समोर येईल. मुंबईत राहणारा मराठी माणूस, हिंदू समाज आज अस्वस्थ आहे. महाविकास आघाडीच्या राजवटीत प्रत्येकाला बोलायचं आहे त्यांच्या समस्या मांडायच्या आहेत. आपण जर आज बोललो नाही तर आपल्याला दाबायचा प्रयत्न हे सरकार करेल. आज आंदोलन करणाऱ्यावर लाठ्याकाठ्या चालवल्या जातात. त्यामुळे या मराठी कट्ट्यावर याचं सर्वसामान्य माणसाच्या समस्या ऐकून घेतल्या जातील त्यांच्यावर चर्चा होईल आणि भाजपला जनता आशीर्वाद देईल हा विश्वास आहे.