सकारात्मक मानसशास्त्र

    12-Oct-2021
Total Views |

Untitled-1_1  H


मार्टिन सेलिगमन हे जगातील उत्तम सकारात्मक मानसशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा असा विश्वास आहे की, मानसशास्त्रज्ञ व्यक्तीच्या ताकदीपलीकडे आणि सकारात्मक गुणांकडे लक्ष केंद्रित करून त्यांचा विकास करता येतो. पारंपरिक मानसशास्त्रापेक्षा सकारात्मक मानसशास्त्र माणसांमध्ये सद्गुणांचा आढावा घेते.



एक जागतिक कीर्तीचा खेळाडू व्हायचे असल्यास अनेक गुण आणि क्षमता खेळाडूंमध्ये असावी लागते. केवळ मोठमोठ्या संस्थेत लाखो, हजारो, कोट्यवधी रुपये घातल्याने आणि तांत्रिक शिक्षण घेतल्याने कुणी एक सक्षम आणि निपुण खेळाडू बनू शकेल, याची ग्वाही देता येत नाही.एका खेळाडूने तिच्या प्रशिक्षकाकडून आलेल्या ई-मेलचा तिच्यावर कसा परिणाम झाला, याचे दु:खद वर्णन केले आहे. कारण, तो संदेश पूर्ण नकारात्मक आणि खच्ची करणारा होता. “तुला आता अनेक गोष्टी पूर्ण शिकावयास लागतील. या क्षेत्रात तुला तुझ्या नकारात्मक बाजूंची दखल घ्यावी लागेल. आता तुला खरेतर भरपूर कष्ट घ्यावे लागतील.” त्या संदेशात या खेळाडूने काही विधायक व सकारात्मक गोष्टी पूर्वी खेळताना केल्या असतील, याचा अजिबात उल्लेख नव्हता. शिवाय या सगळ्या गोष्टी तिला ती ‘टूर्नामेंट’ खेळताना त्या प्रशिक्षकांनी तिला सांगितला नव्हत्या. ती त्या खेळात कुठलेच पदक मिळवू शकली नव्हती. तिला पाठवलेल्या या संदेशात तिने सरावात काय सुधारणा केल्या पाहिजेत, याचा साधा उल्लेखही नव्हता. त्यामुळे तिला खूप दु:ख तर वाटलेच, पण तिचा आत्मविश्वासही डळमळला. अशा पद्धतीने जर रुक्ष, कोरडा आणि कठोर अभिप्राय जर एखाद्याला दिला, तर खेळाडूत सुधारणा कशी होणार? ती व्यक्ती अधिक खच्ची होईल. त्याच कारणासाठी ‘सकारात्मक मानसशास्त्र’ किंवा ‘पॉझिटिव्ह सायकॉलॉजी’ची खेळाच्या सरावासाठी आणि एकंदरीत दर्जेदार तयारी करण्यासाठी गरज लागते.




मार्टिन सेलिगमन हे जगातील उत्तम सकारात्मक मानसशास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा असा विश्वास आहे की, मानसशास्त्रज्ञ व्यक्तीच्या ताकदीपलीकडे आणि सकारात्मक गुणांकडे लक्ष केंद्रित करून त्यांचा विकास करता येतो. पारंपरिक मानसशास्त्रापेक्षा सकारात्मक मानसशास्त्र माणसांमध्ये सद्गुणांचा आढावा घेते.क्रीडा क्षेत्रात तांत्रिक गुंतागुंतीपेक्षा भावनिक वा मानसिक गुंता अधिक असेल, तर त्याचा परिणाम खेळाच्या कामगिरीवर होतो. अर्थात, हे इतर व्यावसायिक कामगिरीबद्दलही सत्य आणि तथ्य आहे.आतापर्यंत खेळाच्या कामगिरीत सुधारणा करताना खेळाडूंच्या चुकांकडे आणि समस्यांकडे विशेष लक्ष द्यायचे आणि तेवढेच सुधारून घ्यायचे असा कल असे. याला ’ऊशषळलळीं लरीशव लेरलहळपस’ किंवा ’कमतरतेवर आधारित प्रशिक्षण’ म्हणता येईल. आपण क्रिकेटमध्येसुद्धा प्रशिक्षक फटके कुठे मारायचे आणि तंत्र कसे योग्य करायचे सांगताना पाहतो. पण, खेळाडूंच्या बळकटीकरणाच्या दिशेने केलेल्या सल्ल्यात आपण खेळाडूला त्याच्या जमेच्या बाजू काय आहेत आणि त्याचा पूर्ण फायदा त्याला कसा घेता येईल, याचा परामर्श घेऊन सल्लेे देत असतो. यामध्ये प्रेरित मन आणि इच्छाशक्तीचा पूर्ण फायदा खेळाडू घेऊ शकतो. शिवाय यामध्ये खेळाडूची लवचिकता आणि सर्वसामान्य मानसिकता विकसित करणे शक्य होते. मैदानावर एखादा निराशेचा प्रसंग आलाच, तर आपली मानसिक क्षमता न गमवता त्यावर मात कशी करायची, हे खेळाडूंसाठी त्याच्या अंतर्भूत ‘टॅलेंट’पेक्षा आणि तांत्रिक कौशल्यापेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते. ही भावनिक वा मानसिक कौशल्ये आहेत आणि खेळाच्या कामगिरीत अत्यंत महत्त्वाची आहेत.




संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, एखाद्याच्या कमतरतेत वा अक्षमतेत सुधारणा करण्यापेक्षा त्यांच्या सक्षमतेत आणि जमेच्या बाजू अधिक भक्कम करणे, जास्त सोपे आणि प्रभावी आहे. अर्थात, तांत्रिक वजाबाकीत सुधारणा करायला हवी आणि मन जर सकारात्मक असेल, तर तेही सोपे आहे. कारण, आत्मविश्वास ही सर्वांत भक्कम साथ आहे जीवनामध्ये. ज्यांचे गणित आपल्या बलस्थानावर केंद्रित करण्याकडे असते, त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचे बळ, मानसिक ऊर्जा, भावनिक लवचिकता आणि आत्मसन्मान अधिक दिसून येतो. म्हणून प्रशिक्षक आणि त्याचा खेळाडू या दोघांचाही दृष्टिकोन विधायक असणे महत्त्वाचे आहे. बर्‍याच प्रशिक्षकांना याची जाणीव दिसत नाही आणि खेळाडू आपला आत्मविश्वास गमावून बसतात.दोन महत्त्वाचे आणि निर्णायक असे मूलभूत घटक जे खेळाडूची मानसिक ताकद वाढवू शकतात, ते म्हणजे उच्च पातळीची दर्जेदार कामगिरी करणं आणि ते करताना तेवढ्याच उच्च प्रतीची ऊर्जा आपल्या भावविश्वात अनुभवणं. आपल्या सक्षमतेला आणि ऊर्जेला ओळखता येणं, हे खेळांडूसाठी निर्णायक आहे. आपण नीरज चोप्राच्या प्रत्येक मुलाखतीत याची प्रचीती घेतली आहे. त्याला आपला भालाफेकीचा खेळ का भावला? त्याला कुठल्या गोष्टीबद्दल आत्मविश्वास वाटतो? कुठल्या गोष्टीबद्दल त्याला कौतुकाचे बोल ऐकायला मिळतात? तो त्याच्या विरंगुळ्याच्या क्षणी काय करतो? स्वत:ची बलस्थाने तो कशी मजबूत करतो? कुठल्या गोष्टींबद्दल तो स्वत:वर प्रसन्न आहे? भविष्यात त्याच्या काय योजना आहेत, या सगळ्याबद्दल खेळाडू जेव्हा स्पष्ट आणि मोकळा असतो, तेव्हा तो किती ठाम आणि स्वत:बद्दल आश्वासक आहे, याचा अंदाज आपल्या सगळ्यांना येतो. फार दूरवर का जायचं, ‘मास्टरब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हे प्रचंड आत्मिक सामर्थ्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आपल्या नव्या पिढ्या समोर आहेच. (क्रमश:)


डॉ. शुभांगी पारकर