मुंबई : नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. मात्र, बॉलीवुडमध्ये अन्य ३० ते ४० जण ड्रग्ज घेत असल्याची माहिती रियाने दिली आहे. या बॉलीवुड कलाकारांची नावे आता या प्रकरणी पुढे येतात का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर कंगना रणौतने या सातत्याने ड्रग्ज कनेक्शनवर भाष्य केले होते. ड्रग्जच्या विळख्यात बॉलीवुड़ स्टार कसे अडकत जातात यावरही तिने भाष्य केले होते. आता रिया चक्रवर्तीच्या जबाबानंतर बॉलीवुड आणि ड्रग्ज हे संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.
रियाची शीव येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. सायंकाळी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रियाची सुनावणी होणार आहे. त्यानंतर रिया एनसीबीसमोर पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयातील चौकशीत बॉलीवुडची काही बडी नावे समोर येतात का किंवा अन्य चौकशीत नावे येतात का याकडे आता लक्ष्य आहे. एकूण ३० जणांची यादी तयार करण्यात आली असून साऱ्यांची आता पुन्हा एकदा चौकशी होणार असल्याची प्रार्थमिक माहिती आहे.