मुंबई : मुंबई मराठी माणसाच्या बापाची म्हणणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांना अभिनेते सुमित राघवन यांनी 'माझे वडील मराठी नाही ,मी देखील मग मी तुमचा दुश्मन झालो का ?' असा सवाल केला आहे. तसेच तुमचे हे विधान चुकीचे असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे. त्यामुळे शिवसेना-कंगना या ट्विटर वॉरमध्ये संजय राऊतांवर निशाणा साधणारे ते पहिले मराठी कलाकार ठरले.
ते ट्विटमध्ये म्हणाले, "सर माझे वडील मराठी माणूस नाहीत. मी देखील मराठी नाही. पण मी इतरांपेक्षा उत्तम मराठी बोलू शकतो. गेली ३० वर्षे मराठी रंगभूमीसाठी मी काम करतो आहे. माझी मुलं मराठी शाळेत शिक्षण घेत आहेत. मी म्हणतो मुंबई ही कोणाच्याच बापाची नाहीए. मी दुष्मन झालो का? अतिशय चुकीचं विधान आहे तुमचं." असे म्हणत अभिनेते सुमित राघवन यांनी संजय राऊतांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबतचा फोटोदेखील पोस्ट केला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
"मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही. promise. जय हिंद जय महाराष्ट्र." असे ट्वीट करत राऊत यांनी कंगनाला उत्तर दिले होते. संजय रूट यांच्या या विधानाचा कंगनाने देखील समाचार घेतला.तिनं ट्विट केलं की,''इंडस्ट्रीच्या शंभर वर्षांच्या इतिहासात मराठी योद्ध्यांवर एक चित्रपट बनवायची यांची औकात नाही. मुस्लीमांचे वर्चस्व असलेल्या या इंडस्ट्रीत मी माझ्या जीवावर आणि कारकीर्द धोक्यात टाकून शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट तयार केला. आज मी महाराष्ट्राच्या ठेकेदारांना विचारते की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही. ज्यानं मराठी अभिमान जपला आहे, हा महाराष्ट्र त्यांचा आहे. मैं डंके की चोट पे कहती हूँ हॉ मैं मराठा हूँ,उखाड़ो मेरा क्या उखाड़ोगे?''