कंगना रणौतच्या वक्तव्यावरून रेणूका शहाणेंवर पलटवार
मुंबई : कंगना रणौतने मुंबईबद्दल ट्विट करून राज्य सरकार व पोलीसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याविरोधात आता काही दिवसांपासून गप्प असणाऱ्या बॉलीवुडमधील मंडळींनी तोंडसुख घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अभिनेत्री रेणूका शहाणे यांनीही कंगनाला ट्विट करून सुनावले. "उचलली जीभ लावली टाळ्याला, कंगना ज्या मुंबईत तू स्टार झाली त्याबद्दल असे बोलायला नको होते," असे म्हणत त्यांनी तिचे कान टोचले.
परंतू याला आता सामाजिक कार्यकर्त्या प्रिया कुलकर्णींनी उत्तर दिले आहे. हीच गोष्ट आमिर खान, नासीरुद्दीन शाह यांनी देशाबद्दल म्हटली होती. तेव्हा तुम्ही चिडीचुप का होत्या, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तेव्हा भारतीय म्हणून तुमच्या भावनांना ठेच पोहचली नाही का ? काँग्रेसने हिंदू दहशतवाद, अशी थिअरी मांडली होती, तेव्हाही तुम्ही शांत होता. शशी थरूर यांच्या हिंदू तालिबान आणि हिंदू पाकिस्तान या संकल्पनांवरही तुम्ही गप्प होता, असा प्रश्न कुलकर्णी यांनी शहाणे यांना विचारला आहे.