अनुराग कश्यप, एवढा मंदबुद्धी कधी झालास?

    18-Sep-2020
Total Views | 158

kangana_1  H x



बॉर्डरवर चीनशी लढ म्हणणाऱ्या अनुरागला कंगनाचे उत्तर!

मुंबई : कंगना आणि पंगा हे समीकरण तसे जुनेच! पण अलिकडे कंगनाने अगदीच बोल्डपणे बोलायला किंबहुना टीका करायला सुरुवात केल्यापासुन तिच्या समर्थनात असलेले कलाकार सुद्धा तिच्या विरोधात बोलायला लागले आहेत. यामुळेच अलिकडे सोशल मिडीयावरून रोज कंगना विरुद्ध एक कोणताही कलाकार असे वाद सुरु आहेत. काल कंगनाच्या एका ट्विट वरुन अनुराग कश्यपने तिला चीनशी लढण्याचा खोचक सल्ला दिला होता, ज्यावर उत्तर देताना कंगनाने अनुरागला थेट मंदबुद्धी म्हणत पलटवार केला आहे.


कंगनाने तिच्या ट्विटमध्ये म्हंटले होते की," मी एक क्षत्रिय आहे,माझं शीर कापलं तरी झुकु देणार नाही आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी नेहमीच आपला आवाज बुलंद असेल. मान, सन्मान आणि स्वाभिमानासोबत मी जगतेय आणि नेहमीच जगत राहीन, मी स्वतः माझ्या तत्त्वांसोबत तडजोड करत नाही कोणाला करुही देणार नाही." याच ट्विटवर उत्तर देत अनुराग ने कंगनाला, "तु एकटीच आहेस! मणिकर्णिका! तु एक काम कर चार पाच जणांना घेऊन चीनवर हल्ला कर आणि त्यांना दाखवुन दे, तु आहेस तोवर देशाचे कोणी काही वाकडे करु शकणार नाही, तसंही तुझ्या घरापासुन सीमा १ दिवसाच्या अंतरावर आहे. त्यामुळे जा आणि दाखवुन दे शेरनी जा! जय हिंद!", असे ट्विट करत म्हंटले.







तर आता अनुरागच्या या ट्विट ला उत्तर देत कंगनाने पुन्हा एक ट्विट केले आहे. ‘ठीक आहे मी बॉर्डर वर जाते आणि तुम्ही ऑल्म्पिकमध्ये जा. कारण देशाला गोल्ड मेडल हवेच आहेत. हा कोणत दुय्यम दर्जाचा चित्रपट नाहीये, जिथे कलाकार काहीही बनतात. जरा दिलेली उपमा समजत जा, तुम्ही इतके मंदबुद्धी कधी झालात? जेव्हा आपण मित्र होतो तेव्हा तर हुशार होतात.’, असे ट्विट कंगनाने केले आहे. आता यावर अनुराग काय उत्तर देतो, आणि आता पुन्हा नवीन वाद निर्माण होतोय का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121