झी मराठीच्या सेटवर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा!
मुंबई : कोरोनाचे सावट संपूर्ण देशावर आणि जगावर आले आणि त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांसोबत मनोरंजन क्षेत्रावरपण झाला. जवळपास तीन महिने मालिकांचे चित्रिकरण बंद होते. पण अनलॉकनंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
या गणेशोत्सवावर कोरोनाच सावट आहे, तरी देखील गणेशोत्सवाचा उत्साह लोकांमध्ये कायम आहे. गणपती हा विघ्नहर्ता आहे. ६४ कलांचा अधिपती आहे. मग या गणेशोत्सवात मालिकेतील कलाकार मंडळी कशी मागे राहतील... ‘माझा होशील ना’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘Mrs. मुख्यमंत्री’, आणि ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर पण सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा झाला. या सर्व कलाकार मंडळींनी विघ्नहर्त्या गणरायाकडे एकच मागणे केले, की कोरोनाचे हे संकट संपूर्ण जगातून आणि देशातून निघून जाऊदे आणि पुन्हा सर्व पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ दे.
'चला हवा येऊ द्या'चा बाप्पा!

समर-सुमी अर्थात 'मिसेस मुख्यमंत्रीं'चा गणपती बाप्पा!
राणा-अंजलीही रंगलेयत बाप्पाच्या सेवेत!

ब्राह्मेंच्या घराचा पहिला बाप्पा!