राज्यातील मंदिरं व धार्मिक स्थळं सुरु करावीत : रोहित पवार

    16-Aug-2020
Total Views |

rohit pawar_1  



पुणे :
राज्यातील राजकारणात सध्या पवार कुटुंब हे चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर फटकारले होते. यावरून सुरु झालेला वाद संपुष्टात येत नाही, तोपर्यंत आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरे आणि धार्मिकस्थळे सुरू करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.


रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विटरवरून मागणी केली आहे. मंदिरे आणि धार्मिकस्थळे लोकांसाठी सुरू व्हावीत असे माझेही म्हणणे आहे. कारण, त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. तसेच, लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळे याबाबत मी जरूर पाठपुरावा करेन, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.दरम्यान, पर्युषण पर्व काळात मंदिरे खुली करण्याची याचिका जैन समुदायाकडून कोर्टात सादर करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करून मंदिरे खुली करता येणार नसल्याचे म्हटले होते. आता असे असतानाच महाविकास आघाडीचे नेतेच जर मंदिरे खुली करण्याची मागणी करत असतील तर यावर मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.