२५ मुलांच्या स्वप्नांना गंभीरमुळे मिळाले ‘पंख’

    01-Aug-2020
Total Views | 31

Gautam Gambhir_1 &nb
 
नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले. रोजंदारीवर असलेल्या कामगारांचे अतोनात हाल झाले. अशामध्ये अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे गरजूंना मदत करून माणुसकीचे उदाहरणे समोर ठेवली. भारतीय माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर यानेदेखील एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. गंभीरने देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
 
 
 
 
 
कोरोनाकाळात अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशामध्ये देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांसमोर पोटाची खळगी कशी भरायची असा प्रश्न उभा राहिला. यांच्यासाठी खासदार गंभीरने ‘पंख’ उपक्रम राबवत देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या २५ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. देहविक्री करणाऱ्यांच्या मुलांना त्या नरकातून बाहेर काढणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे गंभीर यांनी ट्विट केले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121