गोड बातमी ! क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला पुत्ररत्न...

    30-Jul-2020
Total Views |

Hardik_1  H x W
नवी दिल्ली : भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविच यांना मुलगा झाला आहे. हार्दिकने स्वतः ट्विट करत आपण बाबा झाल्याचे सागितले. बाळाचा हात हातात घेत त्याने एक फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. यापूर्वी लॉकडाऊन काळामध्येच हार्दिकने नताशा गरोदर असल्याची माहिती दिली होती.
 
 
 
 
 
 
भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याला ओळखले जाते. मैदानामध्ये तसेच मैदानाबाहेरही हार्दिक नेहमी प्रकाशझोतात राहिला आहे. याआधी त्याचे ‘कॉफी विथ करण’मधील त्याच्या वक्तव्यावर त्याच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर २०२०च्या सुरुवातीला अभिनेत्री नताशा स्टँकोविच सोबत साखरपुडा करणार असल्याचे जाहीर करून त्याने चाहत्यांना धक्काच दिला. विशेष म्हणजे, त्याच्या साखरपुड्याची कल्पना घरच्यांनाही नव्हती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच नताशा गरोदर असल्याचेही त्याने जाहीर केले होते. गुरुवारी त्याने ट्विट करत ही गोड बातमी दिली.