सरकार कोरोनाच्या तिरडीवर तर, मंत्री क्वारंटाईन! : सदाभाऊ खोत

    17-Jul-2020
Total Views |
uddhav_1  H x W



१ ऑगस्टला राज्य सरकारविरोधात राज्यव्यापी दूधदर आंदोलन करणार!


पंढरपूर : देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा प्रचंड वाढला आहे. कोरोनाबाबत अनेक धक्कादायक, हृदयद्रावक घटना पूढे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार कोरोनाला आळा घालण्यासाठी पुर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका विरोधक सातत्याने करत आहेत. त्यातच आता भाजपाचे समर्थक माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनीहीठाकरे सरकार व त्यांच्या मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.


“ठाकरे सरकार ‘कोरोना’च्या तिरडीवर झोपलेले आहे, तर मंत्रिमंडळातील त्यांचे मंत्री हे क्वारंटाईन झाले आहेत”, अशी बोचरी टीका माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. सदाभाऊ खोत १ ऑगस्टला ठाकरे सरकारविरोधात राज्यव्यापी दूधदर आंदोलन करणार आहेत, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. ते पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते.


लॉकडाऊन आणि त्यानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तींपुढे शेतकरी हतबल झाला असून ठाके सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर नाही असा आरोप खोत यांनी केला.


दरम्यान, “गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना दूधाचा दर कमी मिळत आहे. शेतकरी संघटनांकडून याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र शासन स्तरावर काही निर्णय होताना दिसत नाही. सरकार दूध उत्पादकांना लुटणारच असेल, तर आम्ही फुकट दूध द्यायला तयार आहोत. सरकारने येऊन घेऊन जावे. पण जर सरकार जागे झाले नाही तर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल,” असा इशाराही खोत यांनी दिला.