‘झी मराठी’चे कलाकार आता करणार ५० लाख कॉल्स!

    10-Jul-2020
Total Views | 58

Zee marathi_1  



आवडत्या कलाकाराचा फोन आल्याने प्रेक्षकही होतायत खुश; मार्केटिंगची भन्नाट आयडिया!

मुंबई : काल माझ्या बायकोला कॉल आला, तिने हॅलो म्हटल्यावर समोरून आवाज आला मी आसावरी बोलतेय, झी मराठी मधून आणि ती एकदम खूषच झाली, आणि सगळ्यांना सांगत सुटली.


आश्चर्य वाटलं ना हे ऐकून, पण हे खर आहे उद्या जर मोबाईल वर तुम्हाला हॅलो म्हटल्यावर समोरून मी आदेश बोलतोय, निलेश साबळे बोलतोय, भाऊ कदम बोलतोय, राणादा बोलतोय असे आवाज आले तर बिलकुल आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण ही आपली आवडती कलाकार मंडळी तुमच्याशी संवाद साधतायत, कारण जसजसा १३ जुलै मनोरंजनाचा शुभारंभ जवळ येतोय, तसतसं कलाकार मंडळींमध्ये सुद्धा उत्साह शिगेला पोचला आहे, त्यामुळे आता ही मंडळी हात धुवून मनोरंजन करायच्या मागे लागली आहेत.


जवळपास साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे पुनरागमन होणार आहे आणि याचनिमित्ताने झी मराठीचे लाडके कलाकार प्रेक्षकांना रेकॉर्डेड फोन करून आपल्या कमबॅकबद्दल सांगणार आहेत.


भाऊ कदम, डॉ. निलेश साबळे, आदेश बांदेकर, निवेदिता जोशी- सराफ, अनिता दाते, हार्दिक जोशी हे स्वतःहून प्रेक्षकांना फोन करून त्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहेत. तब्बल ५० लाख कॉल्स करून प्रेक्षकांना आपल्या पुनरागमनाबद्दल सांगणार आहेत. याआधी क्वचितच कोणत्याही कॅम्पेनसाठी खुद्द कलाकारांनी पुढाकार घेऊन चाहत्यांना असा थेट फोन केला असेल. ही आगळीवेगळी संकल्पना घेऊन झी मराठीचे कलाकार रेकॉर्डेड फोन कॉल्समार्फत लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उत्सुक आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121