लडाख : भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. सोमवारी झालेल्या हिंसाचारात भारतीय सैन्यातील २३ जवान शहीद झाले आहेत तर चीनच्याही अनेक सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
भारत आणि चीन यांच्यातील पूर्व लडाखमधील सीमेवर असलेल्या गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीत चीनचे मोठे नुकसान झाले आहे. या चकमकीत चिनी युनिटचा कमांडिंग ऑफिसरही ठार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, एलएसीवरील चकमकीत ४३ चिनी सैनिक मरण पावले आहेत तसेच अनेक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच एएनआय वृत्त संस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीनंतर चार भारतीय जवानांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.