घृणास्पद ! तब्लिगींंनी क्वारंटाइन सेंटरमध्ये उघड्यावर केले शौच

    07-Apr-2020
Total Views |

corona_1  H x W


नवी दिल्ली
: नुकताच दिल्लीतील क्वारंटाइन सेंटरमधील एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे प्रकार तब्लिगींकडून होत आहेत. अशाच एका तब्लीगीना ठेवण्यात आलेल्या दिल्लीतील नरेला येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर काहींनी शौच केल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. याविरोधात नरेला येथील क्वारंटाइन सेंटरकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.



संपूर्ण परिसराचं सॅनिटाझेशन करताना तबलिगींना ठेवण्यात आलेल्या ठिकाणांपैकी २१२ नंबरच्या खोली बाहेर काही तबलिगींनी शौच करण्यासारखा किळसवाणा प्रकार केल्याचे या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. ज्या दोन लोकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे ते दिल्लीतील निझामुद्दीन येथे पार पडलेल्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांना सध्या दिल्लीतील नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. एफआयआर दाखल करण्यात आलेले दोन जण वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कोणतीही गोष्ट ऐकत नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी असलेल्या अन्य लोकांनाही धोका निर्माण होऊ शकतो, असेही या एफआयआरमध्ये नमूद त्यात नमूद करण्यात आले आहे.