नवी दिल्ली : कोरोनाचे काळे ढग दिवसेंदिवस गडद होत आहे. देशभरामध्ये लॉकडाऊन पुकारले गेले आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी देशभरातील जनतेला सहाय्यता मदत nidhisathi आवाहन केले आहे. या आवाहनाला मान देत सर्व स्तरांमधून त्यांना मदत होत आहे. आंध्र प्रदेशमध्ये ४ वर्षाच्या हेमंतने सायकलसाठी जमवलेले ९७१ रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले आहेत. त्यांच्या या देणगीबद्दल अनेक स्तरांमधून त्याचे कौतुक होत आहे.
विजयवाडा येथे मंत्री पेरनी वेंकटरामय्यह यांचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी जाउन या मुलाने आपले सायकलसाठी जमा केलेले ९७१ रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले. या मुलाने केलेल्या या कृत्याचे कौतुक केले आहे. सध्या देशभरात करोनाचा कहर असल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अशामध्ये ज्यांचे हातावर पॉट आहे अशा कामगारांचे हाल होत आहेत. या कामगारांना मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर केला जातो आहे.