थुंकी लावण्याचे प्रकार वाढत चालले आहेत ?
भोपाळ : दक्षिण मध्यप्रदेशमध्ये बैतूल बाजारात थुंकी लावण्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपी अब्दुल रफीक, सादी अहमद, रितेश मधाना रिक्षातून टरबूज विकत होते. त्यांनी चाकूवर थुंकी लावून मग टरबूज कापले, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली होती. यात पुरुषोत्तम यादव यांनी पाहिले की पहिल्यांचा चाकूवर थुंकले जात आहे. नंतर टरबूज कापले.
यादव यांनी हा प्रकार बजरंग दल विभाग संयोजक कृष्णकांत गावंडे यांना सांगितला. प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने त्यांनी बैतूल बाजार पोलीसांत या तिघांविरोधात तक्रार केली. पोलीसांनी त्यांची रिक्षा जप्त केली आहे. ज्यात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले टरबूजही ठेवले होते. अनेकांनी ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिल्याने पोलीसांत तक्रार करणे शक्य झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीसांनी तिघांची चौकशी सुरू केली आहे.
यापूर्वीही अशाच प्रकारे, मध्य प्रदेशच्या रायसेन येथे एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक व्यक्ती थुंकी लावून फळ विकत असल्याचे दिसत होते. त्याचे नाव शेरू मियाँ असून पोलीसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याची तक्रार केली. मात्र, त्याच्या मुलीने दिलेल्या माहितीत आपले वडील, अशाच प्रकारे नोटा मोजतात, त्यांना तशी सवय आहे, असे म्हटले होते. शेरूच्या कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे सांगण्यात येत आहे.