पदपथांचे अग्निपथ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2020   
Total Views |


mumbai footpath _1 &


लॉकडाऊनमुळे मुंबईचे रस्ते उघडेबोडके पडले. या निमित्ताने हा होईना, या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या पदपथांनीही मोकळा श्वास घेतला. पण, ‘लॉकडाऊननंतर फेरीवाल्यांचे अतिक्रमण, दुर्गंधी आणि तुटलेल्या अवस्थेतील हे पदपथ मुंबईकरांना पुन्हा एकदा अग्निपथासमान भासू लागतील. तेव्हा, मुंबईतील या पदपथांची दैन्यावस्था आणि पालिकेचे त्यासंबंधी धोरण याचा आढावा घेणारा हा लेख...



रस्त्यांलगतचे पदपथ हे पादचार्‍यांसाठी वरदान मानले जातात. खासकरुन महिला
, वृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्णांना रस्त्यावरुन ये-जा करण्यासाठी हे पदपथ सोयीचे ठरतात. म्हणूनच हे पदपथ मजबूत, कार्यतत्पर व सुरक्षित असायला हवेत. पण, सध्या मुंबई आणि राज्यातील इतर शहरांतील परिस्थिती पाहता, बर्‍याच ठिकाणी या पदपथांवरुन नीट चालण्याचीही सोय राहिलेली दिसत नाही. या पदपथांवरील अतिक्रमणे, अडथळे आणि भिकारी-गर्दुल्ल्यांनी केलेल्या अस्वच्छतेमुळे या पदपथांची पुरती दैना उडालेली दिसते. पदपथांअभावी नागरिकांकडून मुख्य रस्त्याचा वापर केला जातो आणि मग नकळतपणे अपघातही घडतात. या विषयावर बरेचदा पालिकेत चर्चाही होते. धोरण आखणी केली जाते. परंतु या पदपथ बांधणी वा दुरुस्तीतून कंत्राटदारांना कदाचित जास्त प्राप्ती मिळत नसल्याने पदपथांकडे दुर्लक्षच होताना दिसते. बरेदचा या पदपथांविषयीची धोरणेही सामान्य नागरिकांना माहिती नसतात. तेव्हा, त्याविषयी आज सविस्तर माहिती जाणून घेऊया.



पदपथाकरिता मुंबई महापालिकेचे धोरण


पादचार्‍यांची जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी म्हणजे रेल्वेस्थानकांच्या वा अन्य ठिकाणच्या परिसरात पदपथांची रुंदी अधिक ठेवणे गरजेचे आहे. तसेच पदपथांवरील २
.२ मीटर उंचीचा भाग मोकळा ठेवणेही बंधनकारक राहील. पदपथाच्या पृष्ठभागावर चढउतार वा भेगा असू नये, असेही पालिकेचे धोरण सांगते. तसेच पदपथावरील फर्निचर म्हणजे विजेचे खांब, मार्गदर्शक फलक, टपाल पेटी, कचरा पेटी आदी पदपथाच्या एकाच बाजूला असाव्यात. पदपथांची रुंदी तीन भागात विभागण्यात आली असून अर्धा मीटर रुंदीच्या मृत भागात दुकानाच्या व मालमत्तेच्या हद्दरेषा समाविष्ट कराव्यात. दुसरा भाग पादचार्‍यांसाठी व तिसरा भाग फर्निचरसाठी निश्चित करण्यात आला आहे.


मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पदपथाचा आदर्श आराखडा (
standard design) तयार केला. पादचारीस्नेही रचनेमध्ये सायनेज बोर्ड, रस्ता फर्निचर (कचरापेटी, बाक व पोल) आणि बसथांबा यांचे विशिष्ट माप-प्रमाणही ठरविले गेले. पदपथांच्या मापाबरोबर रस्त्यांची मापेही ठरली. नवीन पदपथांमध्ये डकची सोय व्हावी, जेणेकरुन रस्ते वारंवार खणावे लागणार नाहीत, असाही एक नियम आहेच. तेव्हा पादचार्‍यांच्या सुरक्षिततेच्या हिताचा विचार करता, मुंबई महानगरपालिकेने २०१६ मध्ये पदपथविषयक हे नवीन धोरण राबवून मुंबईकरांना जणू एक दिवास्वप्नच दाखविले. कारण, तीन वर्षांचा काळ लोटला तरी या नवीन धोरणातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकाही पदपथावर पादचारीस्नेही बदल होऊ शकलेले नाहीत.



माझ्या आईवडिलांनाही मुंबईच्या पदपथांवरून चालण्याची भीती वाटते,” अशी कबुली देत मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील पदपथांची दुर्दशा मान्य केली होती. रस्त्यावरील पदपथ वापरण्याचा पहिला अधिकार पादचार्‍यांचा असल्याचे पालिकेचे तत्त्व आहे, हेदेखील त्यांनी मान्य केले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाने डिसेंबर २०१६ मध्ये पदपथांकरिता नवीन धोरण जाहीर केले. परंतु अपुरे रस्ते, अपुरी पार्किंग व्यवस्था, पदपथांची चित्रविचित्र जोडाजोड, पादचारीविरोधी रचना आणि फेरीवाला धोरण अपूर्णावस्थेत राहिल्यामुळे पदपथांवरचा फेरीवाल्यांचा सुळसुळाट काही कमी झाला नाही. अशा अनेक गोष्टींमध्ये कोणतेही बदल न केल्याने पदपथाचे धोरण दुर्देवाने फक्त कागदावरच राहिले.


पूर्वी पदपथांवर फरशा बसविलेल्या असायच्या. त्या तुटल्यावर त्यांची दुरुस्तीही पालिकेककडून केली जायची. परंतु
, पावसाळ्यात त्या निसरड्या होतात म्हणून फरशांची जागा पेव्हरब्लॉकने घेतली. परंतु, पेव्हरब्लॉकही उखडून पदपथांवर खड्डे पडायला लागले. फेरीवाल्यांचा उपद्रवही पादचार्‍यांना होऊ लागला. काही पदपथांवर तर चक्क झोपड्याही उभ्या राहिल्या आणि पदपथांचे अस्तित्वच कुठे तरी नाहीसे झाले. खरं सांगायचं तर मुंबईतील पदपथांची दुरुस्ती म्हणजे एक गौडबंगाल आहे. काही पदपथ सिमेंट काँक्रिटचे, तर काही डांबरी आणि पेव्हरब्लॉकला बंदी असली तरीही ते बसवलेले दिसतात. पेव्हरब्लॉकच्याऐवजी स्टेन्सील काँक्रिटही लावलेले असते.



पदपथ पादचार्‍यांसाठी का दुकानदारांसाठी
?


न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला सुनावले होते की
, कुलाब्याच्या एका दुकानदाराने दुकाने पदपथ व्यापून थाटली आहेत म्हणून पादचार्‍यांची गैरसोय होत आहे. पालिका अधिकार्‍यांनी तेथे जाऊन खातरजमा करावी आणि पदपथावर दुकानदारांनी अतिक्रमण केलेले आढळल्यास दुकानदारावर कारवाई करावी. या विषयांचा अहवाल तीन दिवसांत द्यावा.



सिद्धिविनायककरिता
युनिक पदपथ


दादर-माहीम परिसरातील अनेक धार्मिक तसेच पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. त्यात सिद्धिविनायक मंदिर व माहीम दर्ग्यापर्यंत ते चालत जातात.
जी-उत्तरप्रभागाने पादचार्‍यांच्या सोयीकरिता युनिक पदपथ निर्मितीचा निर्णय घेतला आहे. माहीम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिर असा साडेचार किमी लांब युनिक पदपथ असेल व त्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात येईल. ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांसह सर्वसामान्यांसाठी ठराविक अंतरावर बैठक व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाणी ठेवण्यात येणार आहे. स्वच्छतेकरिता जागोजागी कचराकुंड्या ठेवल्या जातील. दिशादर्शक फलक व शोभेची झाडे ठेवली जातील. भिंतीही आकर्षक व सामाजिक चित्रांनी रंगविली जाणार आहेत. या प्रकल्पाला साडेसहा कोटी खर्च येणार आहे.



पदपथांची कामे झाल्यानंतरची प्रत्यक्ष वस्तुस्थिती

 

फेब्रुवारी २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत मुंबई महापालिकेने १५० कोटी रुपये पदपथांच्या दुरुस्तीकरता वा नवीन पदपथ बांधण्यासाठी खर्च केले आहेत. जानेवारी २०१९ मध्ये महापालिकेने तीन हजार किमी लांबीच्या पदपथांच्या देखभाल व दुरुस्तीकरिता १०० कोटी रुपये २०१९-२०च्या वार्षिक अंदाजनिधीकरिता राखून ठेवले होते. शिवाय या वर्षींच्या १४०० कोटींच्या रस्ता प्रकल्पांबरोबर नवीन धोरणाअंतर्गत पदपथांची कामेही करण्यात आली. परंतु, या पदपथांच्या नूतनीकरणावर बर्‍याच जणांचा विश्वास बसला नाही. एका वृत्तपत्राच्या वार्ताहर समूहाने मुंबईतील ३०-४० पदपथांचे फोटो घेऊन जानेवारी २०२० मध्ये तपासणी केली. तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती जवळून अनुभवल्यानंतर त्याविषयी अहवाल तयार केला. त्यावरुन शहरातील बरेचसे पदपथ थोड्या बर्‍या अवस्थेत असून शहरातील काही व उपनगरांतील पदपथांची माहिती संक्षेपाने खाली दिली आहे.


. परळ रेल्वे स्थानक ते केईएम हॉस्पिटल - या हॉस्पिटलला जाण्याकरिता अनेक लोकांची पायी वर्दळ असते. जाण्यासाठी जगन्नाथ भातणकर रस्ता व आचार्य दोंदे मार्गावर पदपथ आहेत. पदपथांची स्थिती उत्तम आहे व त्याच्या कडेला कुंपण आहे, पण ते उंचीला कमी आहे. त्यावर फळ व भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आढळले. पदपथांच्या पृष्ठभागावर पेव्हरब्लॉक असून ते अनेक ठिकाणी निखळलेले आहेत. पादचारी अडथळे बाजूला करत करत या पदपथांवरुन मार्ग काढल्याचे दिसून आले.


. फाईव्ह गार्डन माटुंगा - सकाळ-संध्याकाळ लोकांच्या आवडीचे व जॉगिंगचे ठिकाण. गार्डनच्या भोवती पदपथे आहेत. पदपथांची स्थिती रुंद व उत्तम आहे. पण, ते फेरीवाल्यांनी वेढलेले व अतिक्रमित राहते. काही लोकांच्या तेथे बाईक पार्क केलेल्या असतात. त्यामुळे पादचारी चालण्याकरिता रस्त्याचाच वापर करतात.


. महालक्ष्मी मंदिर व हाजी अली दर्गा - केशवराव खाड्ये आणि भुलाभाई देसाई मार्गांवरील पदपथ पादचार्‍यांकडून वापरले जातात. पदपथ उत्तम स्थितीत आहेत. पण, अरुंद व इमारतींच्या प्रवेशद्वारांच्या अडथळ्यांनी व्याप्त आहेत. पदपथ जास्ती उंचावर असल्यामुळे काहींना ते वापरता येत नाहीत.


. अंधेरी आणि बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर दररोज सुमारे आठ ते दहा लाख पादचार्‍यांची वर्दळ असते. पदपथ फेरीवाले व छोट्या दुकानदारांनी अतिक्रमित आहेत. पादचार्‍यांना चालायला जागा मिळत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.


. वांद्रे रेल्वे स्थानक पूर्वेकडील रस्ता - या स्थानकावरुन दररोज अंदाजे आठ लाख पादचारी ये-जा करतात. पण, तरीही या रस्त्यावर पदपथ नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरुनच चालावे लागते. त्यामुळे वाहतूककोडींचीही समस्या उद्भवते. तसेच हा रस्ता फेरीवाल्यांनी व रिक्षा पार्किंगने अतिक्रमित आहे. स्कायवॉकही गल्या सहा महिन्यांपासून बंद आहे.


. वांद्रे पश्चिम लिंक रोड - विद्यार्थी व शॉपिंग करणार्‍या गिर्‍हाईकांनी हा रस्ता व्याप्त असतो. पदपथ फेरीवाले व वाहने पार्किंगने अतिक्रमित असतात.


. व्ही. एन. पुरव मार्ग, चेंबूर - मॉल व खाद्यदुकानांनी हा मार्गावरील पदपथ बहुतांशी व्याप्त आहेत. काही ठिकाणी पदपथ ठीकठाक अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी पदपथ दृष्टीसही पडत नाही.


. घाटकोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ - सुमारे पाच लाख पादचार्‍यांची वर्दळ असते. स्थानकाजवळील पदपथ पूर्णपणेन फेरीवाल्यांकडून अतिक्रमित आहेत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावर लोकांची झुंबड उडते.


. कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळ - रोज आठ लाख पादचार्‍यांची वर्दळ असूनही तिथे अद्याप पदपथ नाहीत. रेल्वे स्थानकात फेरीवाल्यांना बंदी असली तरी ते स्थानकाची प्रवेशद्वारे अडवून बसलेले दिसतात. त्यामुळे पादचार्‍यांची गैरसोय होते.


१०
.. विक्रोळी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ - पाच लाख पादचार्‍यांची वर्दळ असते आणि येथील सर्व पदपथ हे खाद्यविक्रेते आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमित आहेत.


खरं तर कुठल्याही शहराचे सौंदर्य हे शोभिवंत पदपथांनी वृद्धिंगत होते. विदेशातील रस्त्यांची चित्रे पाहून किंवा तिथे प्रत्यक्षात गेल्यावर याची आपल्याला प्रचितीही येते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पदपथांच्या धोरणांचा पुनर्विचार करावा आणि मुंबईकरांची पायी गतीही कशी खंडित होणार नाही
, याची दक्षता घ्यावी.

@@AUTHORINFO_V1@@