मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबईमध्ये हल्ला करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नीसुद्धा होती. स्टुडिओमधून घरी जात असताना त्यांच्यावर दोन अज्ञात लोकांनी हल्ला केला. अर्णब आणि त्यांची पत्नी पूर्णपणे सुरक्षित आहेत, त्यांना कोणतीही जखम झाली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कलम ३४१ आणि ५०४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.
संपादक अर्णब गोस्वामीने दिलेल्या माहितीनुसार, “मी आणि माझी पत्नी रात्री बाराच्या सुमारास सहकार्यांआसह कार्यालयातून घरी जात होतो. गणपतराव कदम मार्गावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मला मागे टाकले. त्याने मार्ग अडविला आणि ड्रायव्हरच्या बाजूने अनेकदा कारच्या खिडकीवर जोरदार धडक दिली. मी गाडी चालवत होतो. काच फुटल्या नाहीत तर त्यांनी द्रवपदार्थाची बाटली काढून गाडीवर फेकली. तो शिव्याही देत होता.” हे हल्लेखोर युवा कॉंग्रेसचे कार्यकर्त्ये असल्याचेदेखील त्याने या व्हिडियोमध्ये सांगितले आहे. तर सोनिया गांधी आणि वाड्रा परिवारावरदेखील त्यांनी आरोप केले आहेत.
सोनिया गांधी यांच्यावर भाष्य केल्यामुळे अर्णबविरुद्ध केली होती तक्रार
कॉंग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर भाष्य केल्यामुळे अर्णब गोस्वमीविरोधात काही कॉंग्रेसच्या नेत्यांनी तक्रार केली होती. ‘ईटलीवाली सोनियाजी’ असा त्यांचा वारंवार उल्लेख केल्याने काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.