‘डिजिटल इंडिया’ ते ‘डिजिटल सर्वोदय’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Apr-2020   
Total Views |


digital india_1 &nbs


डिजिटल इंडियाच्या रुपात भुसभुशीत जमिनीवर या कंपन्यांची पाळेमुळे भविष्यात खोलवर रुजू लागतील. रिलायन्स जिओमध्ये फेसबुकतर्फे केली जाणारी ५.७ दशलक्ष डॉलर (४३ ,५७४कोटी) इतकी मोठी गुंतवणूक हे त्याचेच एक यश म्हणावे लागेल.



भारत सरकारने कोणे एकेकाळी लावलेल्या
डिजिटल इंडियारोपाचा वृक्ष आता बहरत आहे. बलाढ्य उद्योगपतींनी, व्यावसायिकांनी आणि कंपन्यांना उद्योगधंद्यांत पाय रोवण्यासाठी एक व्यवसायपूरक वातावरण लागते. त्यापैकी डिजिटल इंडियाच्या रुपात भुसभुशीत जमिनीवर या कंपन्यांची पाळेमुळे भविष्यात खोलवर रुजू लागतील. रिलायन्स जिओमध्ये फेसबुकतर्फे केली जाणारी ५.७ दशलक्ष डॉलर (४३ ,५७४कोटी) इतकी मोठी गुंतवणूक हे त्याचेच एक यश म्हणावे लागेल. शंभर कोटी जनता मोबाईल वापरणारी, त्यापैकी ४० कोटींहून अधिक जणांकडे व्हॉट्सअ‍ॅपसारखा डिजिटल मंचआणि अशीच डिजिटल यंत्रणा सुसह्यपणे वापरणारा सर्वात जास्त तरुणांची संख्या असलेला आपला देश. भारत सरकारच्या डिजिटल इंडियायोजनेला सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय पातळीवरील मिळालेला प्रतिसाद, डिजिटल क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांचा उगम, ई-कॉमर्ससारखी मोठी बाजारपेठ, सेवा क्षेत्रालाही डिजिटल व्यासपीठावर आणणारी यंत्रणा या सर्व गोष्टी पाहता, फेसबुकची भारतातील गुंतवणूक हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.




मार्क झुकरबर्ग आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात
, “जगात बर्‍याच गोष्टी आत्ताही (कोरोनाच्या काळात) सुरू आहेत. माझ्या भारतातील गुंतवणुकीबद्दल थोडी माहिती द्यायची आहे. फेसबुक आणि जिओएकत्र येऊन या देशभरातील नव्या व्यावसायिक संधीसाठी काम करणार आहोत. भारत हे फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसाठी सर्वात मोठे व्यासपीठ आहे. इथे कौशल्याला वाव आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये या कम्युनिटीचा उत्तम वापर केला जातो. त्यामुळे हे माध्यम आणखी बळकट करण्याची गरज भारतातल्या सहा कोटी उद्योजकांना याचा फायदा होईल.” लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योजकांना व्यवसायासाठी एका सुरक्षित आणि भरवशाच्या डिजिटल व्यासपीठाची गरज आहे, हे झुकरबर्ग यांनी ओळखले आहे.


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या
जिओचा वाढता पसारा पाहता, याच माध्यमातून एकत्र येण्याचा निर्णय फेसबुकने घेतला. फेसबुक भारतात ४३ हजार, ५७४ कोटींची गुंतवणूक करत आहे. डॉलरचा भाव हा किमान ७०रुपये मानला, तर ढोबळमानाने जिओचे एकूण मूल्यांकन आता लाख, ०६२ कोटी रुपये होऊ शकेल. या करारानंतर जिओमध्ये फेसबुकची ९.९९टक्के इतकी हिस्सेदारी होणार आहे. रिलायन्स जिओचे एकूण ३८.८ कोटी ग्राहक आहेत. मार्क झुकरबर्ग यांना याच दृष्टीने भारतातील व्यवसायात अधिक पाय भक्कम करण्याची गरज वाटते. चार वर्षांमध्ये जिओचा चढता आलेख चाणाक्ष उद्योजकांच्या लक्षात आला आहे, त्याच दृष्टीने ही पायाभरणी सुरू आहे. यापूर्वी इतक्या मोठ्याप्रमाणात ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्टने गुंतवणूक केली होती.



कौशल्य आणि कलागुण ग्रामीण भारताकडेही तितकेच आहेत. तिथल्याही उद्योजकांना संधी हवी आहे. दुर्गम भागांमध्ये केवळ
कनेक्टिव्हिटीपोहोचत नसल्याने तिथल्या कौशल्याला पुढे येण्यासाठी संधी मिळत नाहीत. इंटरनेटची उपलब्धता आणि व्यावसायिक डिजिटल मंचएकत्रितरित्या उपलब्ध झाल्यावर लघु उद्योजकांना बाजारपेठ मिळण्याचे मार्गही सुलभ होतील. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, इतरही उपक्रम संयुक्तरित्या राबविण्याचा उभय कंपन्यांचा विचार सुरू आहे. भारतासारख्या विकसनशील देशात जिथे युवावर्ग एक शक्ती म्हणून उगम पावत आहे, त्या दृष्टिकोनातून विचार केल्यास नव्या रोजगार संधीची आशा करण्यासही हरकत नाही. भारतात कोरोनाचा कहर जगाच्या तुलनेत कमी जाणवत असला तरीही लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती नाजूक आहे. विकासदर अवघ्या दोन ते दीड टक्क्यांवर येईल, अशी शक्यता व्यक्त केली असतानाही फेसबुकसारखी बलाढ्य कंपनी भारतात पाय बळकट करू पाहत आहे. अर्थात, यातही २०२०पर्यंत ३४ कोटी अ‍ॅक्टिव्ह युझर्सवाढवणे हादेखील प्रमुख हेतू आहे. तरीही या दोन कंपन्यांच्या व्यवहाराकडे जगाने एक आदर्श म्हणून पाहणे गरजेचे आहे. संकटकाळात केवळ आर्थिक मदतीपेक्षाही अशा स्वरुपातील गुंतवणुकीची देशालाच नव्हे तर अवघ्या जगाला गरज आहे, हे अधोरेखित झाले. अर्थात, फेसबुकच्या भारतातील या गुंतवणुकीमुळे एक डिजिटल इंडियाएक डिजिटल सर्वोदयपाहू शकेल, अशी अपेक्षा...

@@AUTHORINFO_V1@@