काम मिळेना म्हणून निघाले गावाकडे पण काळाने केला घात

    28-Mar-2020
Total Views |

mumbai_1  H x W
 
 
मुंबई : कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रासह देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परंतु, यामुळे अनेक ठिकाणी दिवसावर रोजंदारी असणार्याची मात्र यामुळे चांगलीच गैरसोय होत आहे. काम नसल्यामुळे हेच रोजगार आपापल्या गावाकडे रवाना होत आहेत. अशामध्ये या काळात आपल्या घराकडे पायी निघालेल्या ७ मजुरांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टेम्पोने धडक दिल्याची घटना घडली शनिवारी पहाटे घडली. यामध्ये ४ जणांचा दुर्दैवी अंत झाला.
 
 
 
हा अपघात विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. तर यामध्ये ३ जण झाले आहेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्भूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे कुठलेही साधन नसल्याने प्रवाशांनी पायी प्रवास करत गाव गाठण्याचा प्रयत्न करत होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.