देशाचा तेल आयात खर्च घटून अर्ध्यावर येण्याचे संकेत

    15-Mar-2020
Total Views | 61
Crude oil _1  H
 
 
नवी दिल्ली : ‘कोरोना’ विषाणूचा वाढता संसर्ग आणि सौदी अरेबियामधील सुरू असलेले कच्च्या तेलासंदर्भातील ‘प्राईस वॉर’ याचा भारताला काही प्रमाणात फायदा होणार असल्याचे संकेत आहेत. कारण, कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने देशातील तेल आयातीच्या खर्चात कपात झाल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. देशातील तेल आयात खर्च २०२०-२१ मध्ये घटून ६४ अब्ज डॉलरवर येण्याचा अंदाज नोंदवण्यात आला आहे. ही तुलना २०१८-१९ मध्ये ११२ अब्ज डॉलर तेल आयातीच्या खर्चाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर कमी होण्याचा अंदाज मांडला आहे.
 
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग सध्या मोठ्या प्रमाणात जगातील व्यापार-उद्यागोवर प्रभाव पाडत आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीत मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे तेल निर्यात देशांची संघटना ’ओपेक’ आणि रशियाच्या जवळपास होत असणार्या तेल उत्पादनात घट करण्यावर सहमती न झाल्याने ‘किंमत युद्ध’ सुरू झाले आहे. यात सौदी अरेबियाने तेल उत्पादन वाढविण्याचे संकेत दिले आहेत.
 
या कारणामुळे तेलाच्या किंमतीत मोठी घसरण नोंदवली आहे. ३० डिसेंबरला ‘ब्रेंट क्रुड’ची किंमत जवळपास ७० डॉलर प्रतिबॅरेलवर व्यवहार करण्यात आला होता. मागील आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत ३१.८२ टक्क्यांनी घसरून ३१.०२ डॉलर प्रतिबॅरेलने खालची पातळी गाठली होती. चालू व्यापारी वर्षात २०१९-२० मध्ये देशातील तेल आयात खर्च १० टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121