माई आणि शेवंताची जुगलबंदी

    06-Feb-2020
Total Views | 68
madhav_1  H x W







माई आणि शेवंताच्या भांडणात अडकणार अण्णा नाईक 


मुंबई : झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २', मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.



RKC2_1  H x W:



नेने वकिलांच्या मदतीने शेवंताला नाईकांच्या वाड्यासमोरच घर मिळतं. एकीकडे माई मात्र अण्णांना पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, दुसरीकडे शेवंता हार न मानता धीटपणे सगळ्या परिस्थितीला सामोरी जातेय. माईंच्या कणखरपणापुढे अण्णा देखील काहीसे हतबल झालेले दिसत आहेत. माई आणि शेवंताची खुन्नस मालिकेची रंजकता अजून वाढवत आहेत. अशातच शेवंताने सोशल मीडियावर तिचा, माई आणि अण्णांचा एकत्र एक फोटो शेअर केला आहे आणि चाहत्यांना त्या फोटोला कॅप्शन द्यायला सांगितलं आहे. या झक्कास फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अण्णा आणि शेवंताच्या जुगलबंदीमध्ये अण्णांचं काय होणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121