ट्रम्प दौर्‍याचे पोटशूळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2020   
Total Views |


trump visit and media_1&n



स्पर्धेतून मागे हटतील ती विदेशी माध्यमे कसली ? त्यातून भारतावर कुरघोडी करणार्‍या पाकी मीडियाने तर या वाहत्या गंगेत हातच धुवून घेतलेले दिसले. हा देदीप्यमान आणि अभूतपूर्व सोहळा जगभरात प्रत्यक्ष दाखवणार्‍या दूरदर्शनचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.



जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि सर्वात जुनी लोकशाही असलेल्या दोन्ही देशांचे प्रमुख ज्यावेळी एकत्र येतात
, तेव्हा प्रसारमाध्यमे असो अथवा सोशल मीडिया, त्यांना एक मोठा आशय विषय चघळण्यासाठी उपलब्ध होतो. साहजिकच या स्पर्धेतून मागे हटतील ती विदेशी माध्यमे कसली ? त्यातून भारतावर कुरघोडी करणार्‍या पाकी मीडियाने तर या वाहत्या गंगेत हातच धुवून घेतलेले दिसले. हा देदीप्यमान आणि अभूतपूर्व सोहळा जगभरात प्रत्यक्ष दाखवणार्‍या दूरदर्शनचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.



परकीय प्रसारण कंपन्यांच्या भारतातील शिरकाव आणि जागतिक मंदीचा एकत्रित परिणाम म्हणजे
‘दूरदर्शन’ आणि एकूणच सरकारी वाहिन्यांनी नांगी टाकली. सरकारदरबारी असलेल्या या वाहिन्यांना आता पाहणार कोण, त्यांचा प्रेक्षकवर्ग संपला, अशी भीती व्यक्त झाली. मात्र, त्यानंतर ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेअंतर्गत याच वाहिन्यांनी घेतलेली भरारी लक्षणीय ठरली. सरकारी कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण, मंत्रिमंडळ निर्णय, पत्रकार परिषदा तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर, स्वीकारलेले अद्यावत तंत्रज्ञान यामुळे जगातील प्रसारमाध्यमांना तोडीस तोड आणि तितकीच लोकप्रिय अशी माहिती प्रसारण यंत्रणा भारतात तयार झाली. सरकारी प्रसारमाध्यमे अशी ओळख असली, तरीही लोकशाहीला शोभेल, अशा नीतीमूल्यांच्या अधीन आणि निष्पक्ष राहून केलेले वार्तांकन त्यांचे वेगळेपण दर्शवते. ‘दूरदर्शन’तर्फे या भेटीदरम्यानचे क्षण अत्यंत बारकाईने टिपण्यात आले. त्यामुळे या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार बनण्याचा लाभ संपूर्ण जगाने घेतला.



पण
, अनेक विदेशी प्रसारमाध्यमांना या मोदी-ट्रम्पभेटीचा पोटशूळ उठला आणि त्यांच्या विश्लेषकांनी दोन्ही देशांविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ट्रम्प यांच्यावर टीका करत त्यांचा अहंकार जोपासण्यासाठी असाच सोहळा अपेक्षित होता, असे म्हटले. “ब्रिटनच्या महाराणीकडे बंकिंगहॅम पॅलेसमध्ये ट्रम्पसाठी मेजवानी ठेवली जाते. फ्रान्समध्ये ‘बास्तिल डे’ला मिलिटरी परेड, जपानमध्ये सुमो सामने दाखवले जातात, तर भारतात ट्रम्प यांच्या आवडीचा विषय म्हणजे लोकांची गर्दी जमवण्यासाठी असा कार्यक्रम केला जातो. ”



पाकिस्तानी वृत्तपत्र
‘डॉन’च्या वृत्तांकनानुसार, ‘अमेरिका फर्स्ट’ विरुद्ध ‘मेक इन इंडियायांच्या लढाईत ट्रम्प आणि मोदी हे अर्थव्यवस्थेचे नुकसानच करत आहेत. चीनशी व्यापारयुद्ध करणारी अमेरिका भारताशी कुठला व्यापार करेल का?, उलट ट्रम्प यांच्या कृतीमुळे भारताची संरक्षण चिंता आणखी वाढणारच आहे. मध्य पूर्वेतील ‘अलजजिरा’ म्हणते, “ट्रम्प यांना ‘सीएए’बद्दल प्रश्न विचारणे योग्यच नाही. काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीची भूमिका स्वीकारण्यासाठी तयार असलेले ट्रम्प स्वतः ‘इस्लाम विरोधी’ असल्याने काय चूक, काय बरोबर हे त्यांना कळत नाही.”



तर
मोदी आणि ट्रम्प हे मुस्लीमविरोधक म्हणूनच ओळखले जातात,” असे ‘सीएनएन’चे म्हणणे. जगातील सर्वात बलाढ्य देशाच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करणे चुकीचे आहे का? आणि खासकरुन ‘अतिथी देवो भव’ अशी शिकवण असणार्‍या भारतात? महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात चरख्यावर सूत कातणारे ट्रम्प अहंकारी वाटावेत का? ज्या देशाने दहशतवाद पोसून, कर्जबाजारी होत स्वतःची अर्थव्यवस्था खिळखिळी करून टाकली, त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलणेच मुळात सूर्याला आरसा दाखविण्यासारखे नाही का? ‘सीएए’बद्दल प्रश्नाला बगल देऊन अंतर्गत विषयांवर भाष्य न करण्याची भूमिका घेणारे ट्रम्प इस्लामविरोधी कसे? का तर केवळ त्यांनी स्वतःच्या देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडवट भूमिका घेतली म्हणून?



डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मोदींनाही इस्लामविरोधक ठरविणार्‍या माध्यमांनी मोदी हे देशातील सर्वधर्मीय नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतात
, हे विसरायला नको होते. ज्यांचा शेजारी दहशतवाद पोसणारा असेल, त्यांना संरक्षण चिंता कायमच असणार आहे, हाच मुद्दा ट्रम्प यांनी उपस्थित करून इस्लामिक दहशतवाद पोसणे बंद करण्याचा इशारा पाकला दिला होता. त्यामुळे पाकिस्तानी आणि ट्रम्प विरोधकांना पोटशूळ उठणे साहजिकच आहे.

@@AUTHORINFO_V1@@