बहावलपूर मदरशातला 'आश्रित'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020   
Total Views |
Bahawalpur-Pakistan_1&nbs





बालाकोट हवाई हल्ल्याला एक वर्ष उलटून गेले. भारतीय हवाई दलाने 'एअर स्ट्राईक' करत हुतात्मा जवानांचा बदला घेतला खरा परंतु, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी 'जैश-ए-मोहम्मद' ही संघटना आणि पाकिस्तानातील बहावलपूर मदरशात 'आश्रित' म्हणून डेरा घालून बसणारा मसूद अझहर याच्यावर कारवाई करण्याची तसदी पाकिस्तान सरकारने अद्याप घेतलेली नाही. फेब्रुवारीमध्ये मसूद बेपत्ता असल्याची माहिती पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दिली. मात्र, वारंवार खोटे बोलणाऱ्पाया पाकचा बुरखा या ना त्या कारणाने टराटरा फाटणे, हे काही नवे नाही. खोटेपणाचा बुरखा फाटण्याची ही तिसरी वेळ आहे.
 
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकातून केलेल्या गौप्यस्फोटानुसार, २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानी गुप्तचर संघटना 'आयएसआय'ने अजमल कसाब हा हिंदू विद्यार्थी असल्याचे भासवण्याचा केलेला प्रयत्न, 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स'च्या (एफएटीएफ) पॅरिस येथे होणार्या बैठकीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल कमालीचे मौन बाळगणे आणि मसूद अझहरचे बहावलपूर मदरशात असलेले वास्तव्य या तीन प्रकरणांमुळे भारताने पाकिस्तानबद्दल मोदी सरकारच्या कार्यकाळात घेतलेली परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका कशी योग्य होती, याचा दाखला स्वतःच पाकिस्तानने दिला आहे.



Bahawalpur-Pakistan_1&nbs
 
तसेच मध्यस्थी करत भारत-पाक सीमा प्रश्न सोडवणे शक्य नाही, ही मोदी सरकारची भूमिकाही योग्यच ठरली आहे. खोटेपणापेक्षा आपल्या दृष्कृत्यांना लपवण्यासाठी निवडलेल्या मार्गावर भरकटलेला पाकिस्तान स्वतःच्याच फेर्यात गुरफटला आहे. 'एफएटीएफ'तर्फे पाकिस्तानला 'ग्रे' यादीतच ठेवण्यात आले आहे. चीनच्या जीवावर उड्या मारणार्या पाकिस्तानला हा डाग पुसणे जितके सोपे वाटते, तितके सोपे नाही. त्यामुळे गेल्यावर्षी 'सीआरपीएफ' जवानांवर झालेला हल्ला असो वा २६/११चा मुंबई हल्ला असो, जिथे जिथे म्हणून दहशतवादाचा उल्लेख येईल, त्यावेळी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेला पाकिस्तान वारंवार बदनामच होईल.




Bahawalpur-Pakistan_1&nbs 

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने दहशतवाद्यांचे तळ अफगाणिस्तानच्या सीमेकडे वळवल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी हवाई हल्ला झाला, तिथे एक मदरसा होता, असा दावा पाकिस्तान करत असला तरीही जे पुरावे भारतीय हवाई दलाने दिले आणि त्यापूर्वीच दहशतवाद्यांचे तळ हलवण्याच्या कामाला वेग आला, यातूनच बरेच काही उमगते. बहावलपूर मदरशात आश्रित असलेल्या मसूदच्या सुरक्षा व्यवस्थेचीही काळजी चोख घेण्यात आली आहे. तसेच 'आयएसआय' आणि पाकिस्तानी सैन्यही त्याला आर्मी सेफ हाऊसद्वारे संरक्षण पुरवत असल्याची बाब उघड झाली आहे. बालाकोटनंतर आता 'जैश'ने हा प्रमुख अड्डा तयार केला आहे. शेकडो एकर जमिनीवर पसरलेल्या या मदरशात सर्वसामान्य सोडा, पोलीस यंत्रणाही पोहोचू शकत नाहीत, अशी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
 


Bahawalpur-Pakistan_1&nbs
मदरशावर दिवस-रात्र घोंगावणारे आणि टेहळणी करणारे ड्रोन, प्रयोगशाळा, ठिकठिकाणी रायफलधारी सुरक्षारक्षक, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, अद्यावत संगणक आदी डामडौल दिमतीला पुरवण्यात आला आहे. याच ठिकाणी एक न्यूजरूमही आहे. उर्दू आणि इंग्रजी नियतकालिकांचे प्रकाशनही याच ठिकाणांहूनच केले जाते. पठाणकोट हल्ल्यातही याच बहावलपूर मदरशाचे 'कनेक्शन' असल्याचा संशय आहे. कारण, मसूदच्या तीन अड्ड्यांपैकी कसूर कॉलनी, बहावलपूर, मदरसा बिलाल हबसी खैबर, पख्तुख्वा, मदरसा मशीद-ए-लुकमान खैबर आदी ठिकाणांचा सामावेश आहे. पठाणकोट हल्ल्याशी संबंधित पुराव्यातील माहितीनुसार, एका फोनचा संबंध याच बहावलपूरशी होता.

 
पाकच्या या नापाक कृत्यांमुळे 'ग्रे लिस्ट' न राहता 'ब्लॅक लिस्ट' झाला तर याचे आश्चर्य वाटणार नाही. दहशतवाद पोसण्याची पाकिस्तानची जुनी खोड आहे. २६ जानेवारी, २०१४ रोजी मुझफ्फराबाद येथे जाहीर भाषण केले होते. याच भागातून हिजबुलच्या म्होरक्याशी तो संबंध ठेवून आहे. काबूल, उत्तर वझिरिस्तान, बहावलपूर येथे त्याचे वास्तव्य कायम असायचे, हे उघड झाले आहे. 'एफएटीएफ'मध्ये दाऊदबद्दल चकारही पाकिस्तानने काढला नाही. पाकने दिलेल्या लेखी उत्तरात दाऊदचा उल्लेखही केला नाही, जसा मसूदचा अड्डा उजेडात आला तसा दाऊदचाही एक दिवस येईल...
@@AUTHORINFO_V1@@