कोरोनाकाळात जीवनावश्यक गोष्टींबरोबरच नागरिकांना गरज होती ती मानसिक व भावनिक आधाराची आणि कोविड योद्धा असलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या या जबाबदारीचे प्रामाणिकपणे निवर्हनही केले. अशावेळी प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत नागरिकांशी आपुलकीने संवाद साधणारे वाशीतील ‘कोविड योद्धे’ भाजप नगरसेवक शशिकांत राऊत यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
शशिकांत हंबीरराव राऊत
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवक
प्रभाग क्र. : ५४
वाशी, नवी मुंबई
संपर्क क्र. : ९५९४२ ०२०१०
कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही. मात्र, योग्य खबरदारी घेत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाची लढाई शक्य आहे. हीच लढाई योग्यरीतीने लढत मुंबईत एकीकडे वेगाने कोरोनाचा फैलाव होत असताना, आपल्या प्रभागात एकही कोरोनाबाधित होणार नाही, याची दक्षता भाजप नगरसेवक शशिकांत राऊत यांनी घेतली. मे अखेरीस ‘लॉकडाऊन’ शिथिल होईपर्यंत राऊत यांच्या प्रभागात एकही कोरोनारुग्ण आढळून आला नाही. नवी मुंबईतील वाशी प्रभाग ५४, सेक्टर २८/२९/१४ मधील काही भाग राऊत यांच्या प्रभागात येतो. या भागात मोठ्या प्रमाणात एपीएमसी मार्केटमधील व्यापारीवर्ग वास्तव्यास आहे. तसेच अनेक नामांकित व्यक्तीदेखील आहेत. ‘लॉकडाऊन’ शिथिल होण्यास सुरुवात झाल्यानंतर काही प्रमाणात रुग्ण आढळून येऊ लागले. यावेळीही राऊत यांनी नागरिकांना सतर्क केले. महानगरपालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या सोबतीने तत्काळ ज्या भागात रुग्ण आढळून आला, त्या भागात निर्जंतुकीकरण करणे, रुग्णाला दवाखान्यात दाखल करणे व कुटुंबीयांच्या अॅन्टिजेन चाचण्या करणे सुरू केले. यावेळी महापालिकेच्या सहकार्याने व कार्यकर्त्यांच्या मदतीने राऊत यांनी प्रभागात सर्वत्र निर्जंतुकीकरणाची फवारणी केली. प्रशासकीय यंत्रणांचे सहकार्य तर होतेच. मात्र, राऊत यांनी स्वतः सर्व इमारतींना निर्जंतुकीकरण करण्याचे फवारणी यंत्र उपलब्ध करून दिले. प्रभागातील सेक्टर २८ मधील २८४, तर सेक्टर २९ मधील ६५ सोसायट्यांचे राऊत यांच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात येत होत्या. ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपेथिक गोळ्यांचे वाटपदेखील केले. संगीतकार शंकर महादेवन यांनीदेखील राऊत यांच्या या कार्याचे कौतुक केले.
कोविड काळात मदतकार्य करत असताना राऊत यांनी स्वतःची काळजी तर घेतलीच; मात्र आपल्या कार्यकर्त्यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची खबरदारीही त्यांनी योग्यरीतीने पार पाडली. विष्णू रणवरे, विठ्ठलशेठ धुमाळ, दत्ता सोले, राजेश राणे, क्षितिज जोशी, प्रसाद वाडा, जेठालाल पटेल, भरत जोशी यांच्यासह जवळच्या अनेक मित्रांनी पहिल्या दिवसापासून या मदतकार्यात शशिकांत राऊत यांना साथ दिली. यावेळी प्रभागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी हे सर्व रात्रंदिवस झटत होते. राऊत यांचा प्रभाग उच्चभ्रू असल्याने केवळ त्यांच्या आरोग्याची खबरदारी घेणे हीच सर्वात मोठी जबाबदारी राऊत यांच्यावर होती. ‘कोविड’ उपचार केंद्रात लवकरात लवकर रुग्णाला सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. २४ मार्च ते आजतागायत भाजीपाल्याची व दुधाची दोन दुकाने महानगरपालिकेच्या संमतीने राऊत यांनी प्रभागात सुरू केली. प्रत्येक घरात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भाजीपाला पुरविला. याबरोबरच प्रभागातील मोठ्या सोसायट्यांमधील वॉचमन, छोटी-मोठी घरगुती कामं करणारे यांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
"गेली ४० वर्षे गणेश नाईक साहेबांसोबत काम करत आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे असून त्यांच्या स्वभावातील निरपेक्ष सेवाभाव हा मला अत्यंत भावतो. मी, माझे इंडस्ट्रियल काम पाहत, नाईक साहेबांच्या सहवासात राहून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर सर्वाधिक भर दिला आहे आणि यापुढेही देत राहीन."
जे रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांच्याशी दिवसातून दोन वेळा राऊत संवाद साधत. योग्य उपचार मिळत आहेत की नाही, याची माहिती घेत होते. त्यामुळे रुग्णांनादेखील दिलासा मिळत असे. यावेळी सरकारी यंत्रणांचीही राऊत यांना मोठी मदत मिळाली. वाशी पोलीस स्थानकातील इन्चार्ज संजीवकुमार धुमाळ यांनीही राऊत यांना सहकार्य केले. राऊत यांच्या प्रभागात अनेक ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. प्रभागात एकूण ५० ते ६० कुटुंबं अशी होती की, एकटे वयस्कर जोडपे राहत होते. ‘लॉकडाऊन’ काळात यांचे मोठे हाल होत होते, त्यांना घरगुती कामांकरिता माणसं मिळत नव्हती. अशावेळी या सर्व नागरिकांना स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे आधार देत मुलाचे कर्तव्य राऊत यांनी पार पाडले. संजीव कुमार धुमाळ यांच्या मदतीने ३० ते ३५ असे ज्येष्ठ नागरिक जे घरात जेवण बनवू शकत नव्हते, अशांच्या जेवणाची सोय राऊत यांनी केली, ही बाब आपल्या आयुष्यातील सर्वाधिक समाधान देणारी असल्याचे राऊत म्हणतात. हे सर्व मदतकार्य करत असताना भाजप नेते गणेश नाईक, संदीप नाईक तसेच सागर नाईक हे वेबिनारच्या माध्यमातून सतत संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात अन्नधान्य नाईक साहेबांकडून येत होते, ते नवी मुंबईतील सर्व १११ प्रभागांत वाटप केले जात होते. सर्व गरजूंना जेवण व अन्नधान्याचे वाटप होत होते. रोटरी क्लब, स्वामी नारायण मंदिर, गजानन महाराज मंदिर यांसारख्या प्रभागातील व प्रभागाबाहेरील सामाजिक संस्थांनी या काळात मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. या सर्व मंदिरांच्या मंडळांनी पुढाकार घेत अन्नदान करण्यासाठी राऊत यांना मदत केली.
या काळात नागरिकांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत होते. त्यापैकी अनेकजण राऊत यांच्याकडे मदत मागत. राऊत यांनीही प्रत्येक गरजूला मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राऊत यांचा अत्यंत जवळचा व सतत संपर्कात असणारा मित्र संजीवकुमार माथूर यांनी त्यांना सहा ते सात दिवस कोरोनाची लक्षण असूनदेखील सांगितले नाही. आजार अगदी अंगावर काढला. त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. माथूर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे राऊत यांनी सर्वाधिक हळहळ व्यक्त केली. ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या कारणास्तव सार्वजनिक कार्यक्रम घेणे शक्य नव्हते. त्यामुळे लोकांशी ऑनलाईन संवाद साधण्यावर राऊत यांनी भर दिला होता. ज्यावेळी कोरोनाबद्दल जागृती करण्याची गरज होती, तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने डिजिटल संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या शंकांचे निराकरण केले होते. या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. डॉक्टरांच्या या मार्गदर्शनाचा साऱ्यांना फायदा झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आदर्श लोकांसमोर उभा राहिला. शशिकांत राऊत यांनी खऱ्या अर्थाने कोरोनाच्या या लढाईत मोलाची कामगिरी बजाविणाऱ्या सफाई कामगारांचा सन्मानदेखील केला. या सर्व कोरोना लढाईत सफाई कर्मचाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी न घेता, आपली सेवा चोख बजावली व कोणतीही तक्रार येऊ दिली नाही याचीच दखल घेत ४० ते ४५ सफाई कर्मचाऱ्यांना वस्त्र, अन्नधान्य व पुष्पगुच्छ देत शशिकांत राऊत यांनी सन्मान केला.