'हैदराबाद मे जीत हमारी है, अगले साल मुंबई की बारी है'

    04-Dec-2020
Total Views |

BMC_1  H x W: 0



मुंबई :
ग्रेटर हैद्राबाद महानगरपालिका निवडणुकांचे कल हाती येत आहे. हाती येत असलेल्या कालांवरून तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आणि एमआयएमच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्ष (BJP) मुसंडी मारत असल्याचं चित्र समोर येत आहे. यावरून भाजपने शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे.




भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ,'हैदराबाद मे जीत हमारी है, अगले साल मुंबई की बारी है' असा नारा लगावत शिवसेनेला आव्हान दिले आहे.हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं टीआरएसच्या जागांवर आघाडी मिळवली आहे. हैदराबाद निवडणूक निकालाची सध्या मतमोजणी सुरू आहे, त्यामध्ये सध्या भाजप आघाडीवर आहे. १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत ७४.६७लाख नोंदणीकृत मतदारांपैकी केवळ ३४.५०लाख (४६.५५टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. ग्रेटर हैदराबाद नगर पालिका (जीएचएमसी) निवडणुकीत ११२२ उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. ओवेसींच्या गडात पाय रोवण्यासाठी पहिल्यांदाच भाजपाने महापालिकेसारख्या छोट्या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचारात आले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ देखील आले होते.