धुळे : नंदुरबार-धुळे विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली आहे. या निवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी झाले आहेत. अमरीश पटेल यांना ३३२ मते मिळाली. तर, काँग्रेसचे अभिजित पाटील यांना ९८ मते मिळाली. तसेच चार मते अवैध ठरवण्यात आली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात मतमोजणी पार पडली.
धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी ९९ टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडली. काँग्रेसमधून भाजप आलेले अमरीश पटेल तसेच भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेले अभिजीत पाटील यांच्यात मुख्य लढत होती. यापैकी ३३२ मते मिळवत पटेल यांनी बाजी मारली. धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे संख्याबळ पाहता त्यांचे पारडे जड असल्याने भाजपचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता.