३१ डिसेंबरला पार्टीचा विचार करताय? मग आधी हे जाणून घ्या..

    24-Dec-2020
Total Views |

2021_1  H x W:  
 
 
 
मुंबई: राज्यात सर्वत्र कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नाही. परंतु नववर्षाचे स्वागत करण्याचा आनंद साजरा करण्यासाठी अनेकांनी नियोजनाची सुरुवात सुद्धा केली. अशातच राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच संचारबंदीबाबत नियम जाहीर केले. पण आता या नियमांमध्ये काहीशी शिथिलता आलीये, असे दिसून येत आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार रात्री ११ ते पहाटे ६ या वेळेत ही संचारबंदी लागु केली होती. पण आता काही नियम शिथिल झालेले आहेत, ते पुढीलप्रमाणे:
१. रात्री ११ नंतर पाच किंवा त्याहून कमी लोकांना एकत्र येता येऊ शकते.
२. प्रतिबंधित क्षेत्रात न येणारे जलक्रीडा, जलविहार, अम्युजमेंट पार्क आणि काही पर्यटनस्थळी इनडोअर खेळांसाठी परवानगी      देण्यात आलेली आहे.
३.प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरील पर्यटनस्थळे सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
४. स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सार्वजनिक प्रार्थनेसाठी केवळ ५० माणसे उपस्थित राहू शकतात.



curfew_1  H x W


परंतु सरकारने घालून दिलेले कोरोनाबाबतचे नियम प्रत्येकाने पाळायचेच आहेत हे, महापालिकेकडून निक्षून सांगण्यात आले आहे. तसेच संचारबंदीच्या नियमांचे पालन करायची सुद्धा सुरुवात झालेली आहे. ग्रामीण भागातसुद्धा संचारबंदी लागू करायची झाल्यास त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.