व्यापाऱ्यांना लावलेल्या करा विरोधात भाजपाचा एल्गार

    24-Dec-2020
Total Views |

vasai_1  H x W:



खनिवाडे :
भाजपा वसई-विरार ने वसई-विरार महानगरपालिकेने व्यापाऱ्यांना लावलेल्या करा विरोधात शंक फुकले असून, त्याविरोधात वसईतील विश्वकर्मा हॉलमध्ये घेतलेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीस व्यापाऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांना संबोधित करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार हेमेंद्र मेहता, महाराष्ट्र प्रदेशचे व्यापारी आघाडीचे महासचिव महेंद्र जैन, भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक, भाजपा वसई-विरार व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष विरेंद्र पटेल,भाजपा वसई रोड मंडळ उपाध्यक्ष वसंत शहा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अभय कक्कड, ऍड. पी. एन. ओझा उपस्थित होते. भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी उपस्थितांना संबोधित करताना, महानगरपालिकेने लावलेल्या कराविरोधात आपण राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालून ह्या विषयवार त्यांचे मार्गदर्शन घेऊ. असे ते म्हणाले.जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी बोलताना, वेळ पडल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठाऊ पण व्यापाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. असे ते म्हणाले.


जिल्हा महासचिव व कार्यक्रमाचे आयोजक उत्तम कुमार यांनी बोलताना, या कराला सर्वस्वी जबाबदार बविआ व आता ठाण्यातून चालत असलेले महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. २०१९मध्ये सत्तेत असलेल्या बविआ ने स्थायीसमितीच्या सभा ठराव ८२ मध्ये दिनांक ११ /७/२०१९ रोजी मंजूर करून घेतला होता. यावेळी बविआचे उमेश नाईक यांनी सूचक केले होते तर कल्पेश नारायण मानकर यांनी अनुमोदन केले होते. त्यामुळे आता बविआने 'मी नाही त्यातली...' यातले नौटंकी धंदे बंद करावे असा सज्जड इशाराच यावेळी त्यांनी बविआला दिला. आज ठाण्यातून चालत असलेल्या महानगरपालिकेने हा कर लागू केला असल्याने हे दोघे एका माळेचे मणी असल्याचे यावेळी ते म्हणाले.यावेळी मंचावर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, जिल्हा महासचिव महेंद्र पाटील, राजू म्हात्रे व औद्योगिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रितेश सत्यनाथ उपस्थित होते. वसई रोड मंडळ अध्यक्ष रामनुजम, मंडळ सरचिटणीस रमेश पांडे, महेश सरवणकर, विजय वोरा यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोपाळ परब यांनी केले.