सुशांत सिंह राजपूतचे वडिल रुग्णालयात दाखल

    21-Dec-2020
Total Views |

ke.ke.sing_1  H




                                                               के.के.सिंह यांचा रुग्णालयातील फोटो वायरल


मुंबई: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के.के.सिंह यांना राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तात्काळ त्यांना हरियाणा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली, तरी अजूनही त्यांना घरी आणलेले नाही.
 
 
 
 


१४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीलाच धक्का बसला होता. तसेच सुशांत सिंह राजपूतच्या घरच्यांसाठी देखील हा मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून सुशांतचे वडील अजूनही सावरले नसल्याचे वृत्त समोर येत आहे. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी CBI, NIB सारख्या संस्थासुद्धा चौकशी करत असून अजूनही या प्रकरणाची चौकशी पूर्ण झालेली नाही.


सुशांतचे वडील के.के.सिंह यांचे वास्तव् सुरुवातीला बिहार येथे होते. पण सुशांतच्या मृत्यूनंतर ते फरीदाबादमध्ये राहायला आले होते. बॉलिवूड छायाचित्रकार विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर के.के. सिंह यांचा फोटो शेअर केला. त्यानंतर ही बातमी सर्वत्र पसरली. या फोटोत सुशांतचे वडील रूग्णालयाच्या बेडवर बसल्याचे दिसत आहेत. तसेच सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मीतू यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यही रुग्णालयात उपस्थित आहेत. मुख्य म्हणजे सुशांतचे चाहते के.के.सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.