‘श्रीमद्भगवद्गीता’ सप्रेम भेट म्हणून देण्याचे केले आव्हान
मुंबई: भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीदिन भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी ‘अटल गीता जयंती’ दिन साजरा करणार आहे.“स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनीच ‘गीता जयंती’ आल्याने, हा सुवर्णयोग आपण सर्वांनी साजरा करावा,” असे आवाहन भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे. या दिवशी ‘श्रीमद्भगवद्गीते’चे सामुदायिक पठण केले जाणार आहे.

“२५ डिसेंबर २०२० रोजी स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनीच ‘गीता जयंती’ आली आहे. हा सुवर्णयोग आपणा सर्वांनी साजरा करावा असा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जसं नेहमी सांगत असतात की, ‘मेरे पास दुनिया को देने के लिए गीता से बढकर कुछ नहीं है और दुनिया के पास भी पाने के लिए इससे बढकर कुछ नहीं है।’ म्हणूनच, या दिवशी आपण सर्वांनी ‘श्रीमद्भगवद्गीते’चे पूजन करून सामूहिक पठण करावे आणि भाजप पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी किमान पाच जणांना ‘श्रीमद्भगवद्गीता’ सप्रेम भेट म्हणून द्यावी,” असे कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन ‘भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी’च्या वतीने करण्यात आले आहे.